India vs Zimbabwe, 3rd T20I: भारतीय संघाने बुधवारी (१० जुलै) झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यांत २३ धावांनी विजय मिळवला. हा विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे.
भारताचा हा टी२० क्रिकेटमधील १५० वा विजय होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५० विजय मिळवणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी कोणत्याच संघाला असा कारनामा करता आलेला नाही.
भारतीय संघाने आत्तापर्यंत २३० टी२० सामने खेळले असून यात १५० विजय मिळवण्याबरोबरच ६९ पराभव स्विकारले आहेत. तसेच ५ सामने बरोबरीत सुटले, तर ६ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
१५० विजय - भारत (२३० सामने)
१४२ विजय - पाकिस्तान (२४५ सामने)
१११ विजय - न्यूझीलंड (२२० सामने)
१०५ विजय - ऑस्ट्रेलिया (१९५ सामने)
१०४ विजय - दक्षिण आफ्रिका (१८५ सामने)
१०० विजय - इंग्लंड (१९२ सामने)
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १८२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने ४९ चेंडूत सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने ४९ धावा केल्या, तर यशस्वी जयस्वालने ३६ धावांची खेळी केली.
झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला २० षटकात ६ बाद १५९ धावा करता आल्या. झिम्बाब्वेकडून डायन मेयर्सने ४९ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. तसेच क्लाईव्ह मदांडे यांनी ३७ धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. आवेश खानने २ विकेट्स घेतल्या, तर खलील अहमदने १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.