IND vs ZIM: मराठमोळ्या तुषार देशपांडेला मिळाली पदार्पणाची संधी, चौथ्या T20 साठी अशी आहे 'प्लेइंग-11'

India vs Zimbabwe, T20I: झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यातून भारतीय संघासाठी तुषार देशपांडेने पदार्पण केले आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India vs Zimbabwe, 4th T20I Match: भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मालिकेतील चौथा सामना शनिवारी (१३ जुलै) होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने मोठा बदल केला आहे. या सामन्यात तुषार देशपांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याला आवेश खानच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तू ११५ वा खेळाडू ठरला आहे.

Team India
IND vs ZIM: शतक करण्यासाठी अभिषेकला लकी ठरली शुभमन गिलची बॅट, सामन्यानंतर उलगडलं मोठं रहस्य

वेगवान गोलंदाज असलेल्या तुषारला यंदा पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले होते, त्यानंतर आता त्याला पदार्पणाचीही संधी मिळाली आहे.

तुषारने आयपीएल २०२४ स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याने १३ सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेतल्या.

भारताचा मालिका विजयाची संधी

भारतीय क्रिकेट संघाने जर हा सामना जिंकला, तर भारतीय संघ मालिकेतील विजय निश्चित करेल. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पराभव स्विकारला होता, मात्र त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ सध्या २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे.

Team India
IND vs ZIM, T20I: झिम्बाब्वेवरील विजय टीम इंडियासाठी ठरला ऐतिहासिक, आजपर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम केला नावावर

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

झिम्बाब्वे: वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), रिचर्ड एनगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा

भारत: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.