IND vs ZIM, T20I: एकदिवस आधी शुन्यावर आऊट झालेल्या अभिषेकचा दुसऱ्याच दिवशी शतकी धमाका, दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

Abhishek Sharma Century: भारताच्या २३ वर्षीय अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टी२०मध्ये शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
Abhishek Sharma
Abhishek SharmaX/BCCI
Updated on

Abhishek Sharma Century Record: झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात दुसरा टी२० सामना रविवारी (७ जुलै) खेळला गेला. या सामन्यात भारतीय फलंदाजांची बॅट चांगलीच तळपली. भारताने या सामन्यात २० षटकात २ बाद २३४ धावा उभारल्या. या सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक शतक केले, तर ऋतुराज गायकवाड आणि रिंकु सिंग यांनीही शानदार खेळी केल्या.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या सामन्याच्या एकच दिवस आधी शनिवारी भारतीय संघाला पहिल्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेने दिलेल्या ११६ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता. पहिल्या टी२० मध्ये अभिषेक शर्माने पदार्पण केले होते. मात्र, तो शून्यावरच बाद झालेला.

मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याने दुसऱ्या टी२० सामन्यातून त्याच्यातील क्षमता दाखवून दिली आहे. अभिषेकने रविवारी ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. त्याने ४६ चेंडूत षटकारासह शतक पूर्ण केले होते. हे शतक त्याच्यासाठी विक्रमी ठरले.

Abhishek Sharma
IND vs ZIM 2nd T20 : पहिल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल! 'या' पठ्ठ्यानं केला डेब्यू

अभिषेक झिम्बाब्वेविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला. याशिवाय पदार्पणानंतर केवळ दुसऱ्याच सामन्यात शतक करणाराही तो भारताचा पहिलाच खेळाडू आहे. यापूर्वी दीपक हुडाने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणानंतर तिसऱ्या डावात टी२०मध्ये शतक केले होते, तर केएल राहुलने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणानंतर चौथ्या डावात शतक केले होते.

दिग्गजांच्या यादीत स्थान

इतकेच नाही, तर अभिषेकने सर्वात कमी चेंडूत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या केएल राहुलची बरोबरी केली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने २०१७ मध्ये इंदूरला झालेल्या टी२० सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूत शतक केले होते.

भारतासाठी टी२०मध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारे क्रिकेटपटू

  • ३५ चेंडू - रोहित शर्मा (वि. श्रीलंका, इंदूर, २०१७)

  • ४५ चेंडू - सूर्यकुमार यादव (वि. श्रीलंका, राजकोट, २०२३)

  • ४६ चेंडूत - केएल राहुल (वि. वेस्ट इंडिज, लॉडरहिल, २०१६)

  • ४६ चेंडू - अभिषेक शर्मा (वि. झिम्बाब्वे, हरारे, २०२४)

Abhishek Sharma
IND vs ZIM, 2nd T20I: अभिषेकचं शतक, तर ऋतुराजचीही तुफानी फटकेबाजी; भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ठोकल्या विश्वविक्रमी धावा

चौथा युवा खेळाडू

अभिषेक हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात कमी वयात पहिले शतक झळकावणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडूही ठरला आहे. रविवारी त्याने हे शतक केले, तेव्हा त्याचे वय २३ वर्षे ३०७ दिवस होते.

सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये शतक करणारे भारतीय क्रिकेटपटू

  • २१ वर्षे २७९ दिवस - यशस्वी जैस्वाल (वि. नेपाळ, २०२३)

  • २३ वर्षे १४६ दिवस - शुभमन गिल (वि. न्युझीलंड, २०२३)

  • २३ वर्षे १५६ दिवस - सुरेश रैना (वि. दक्षिण आफ्रिका, २०१०)

  • २३ वर्षे ३०७ दिवस - अभिषेक शर्मा (वि. झिम्बाब्वे, २०२४)

Chitra kode:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.