IND A vs AUS A: ऋतुराज ऑन 'गोल्डन' डक, घरच्या मैदानावर Aussies चा दणका; भारताचा १०७ धावांवर खुर्दा

IND A vs AUS A 1st Test: भारत 'अ' - ऑस्ट्रेलिया 'अ' पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव अवघ्या १०७ धावांवर गुंडाळला.
ruturaj gaikwad
ruturaj gaikwad esakal
Updated on

IND A vs AUS A 1st Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारत 'अ' - ऑस्ट्रेलिया 'अ' पहिल्या सामन्याला सुरूवात झाली असून ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवसापासून आपले वर्चस्व दाखवण्यास सुरूवात केली आहे. भारतातील अवघ्या ३ फलंदाजांना २ आकडी धावसंख्या करता आली. पण कोणालाही अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. ब्रेंडन डॉगेटने भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव अवघ्या १०७ धावांवर गुंडाळला.

यावरून हे लक्षात येते की ऑस्ट्रेयाविरूद्ध घरच्या मैदानावर मालिका जिंकणे किती अवघड आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. कर्णधार ऋतुराज गायकवाडसह ३ भारतीय फलंदाज शुन्यावर बाद झाले. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन ७ धावांवर बाद झाला, तर इंद्रजित (९), इशान किशनला (४) अशा धावा करता. साई सुदर्शन (२१), देवदत्त पडिकल (३६) व नवदीप सैनी (२३) धावांचे योगदान दिले.

ruturaj gaikwad
Gautam Gambhir cheating case : गौतम गंभीर अडचणीत ! दिल्ली कोर्टाने दिले तपासाचे आदेश, जाणून घ्या 'चिटींग' प्रकरण

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उल्लेखनीय कामगीरी केलीय ज्यामध्ये ब्रेंडन डॉगेट या भारताचे भारताचे ६ खेळाडू बाद करण्यात यश आले. त्याला जॉर्डन बकिंगहॅमने २ विकेट्स घेत साथ दिली, तर फर्गस ओ'नेल व टॉड मर्फी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला. भारताचा डाव ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना १०७ धावांवर गुंडाळण्यात यश आले.

ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात दिवसाअखेरीस ४ विकेट्स गमावत ९९ धावा केल्या. ज्यामध्ये सॅम कॉन्स्टस व कॅमरॉन बॅंक्रॉफ्ट शून्यावर बाद झाले. मार्कस हॅरीस (१७) व बीऊ वेबस्टर (३३) //यांनी धावांचे योगदान दिले. तर, नेथन मॅकस्विनी (२९) व कूपर कॉनोली (१४) धावांवर नाबाद आहेत. मुकेश कुमार व प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी २ विकेट्स घेण्यात यश आले.

भारत 'अ' प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, बाबा इंद्रजीथ, इशान किशन (व.), नितीश रेड्डी, मानव सुथार, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया 'अ' प्लेइंग इलेव्हन

नेथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमरॉन बॅंक्रॉफ्ट, कूपर कॉनोली, मार्कस हॅरिस, सॅम कॉन्स्टस, टॉड मर्फी, फर्गस ओ'नेल, जोश फिलिपे, बीऊ वेबस्टर, जॉर्डन बकिंगहॅम, ब्रेंडन डॉगेट.

ruturaj gaikwad
IND vs NZ 3rd Test : तिसऱ्या कसोटीपूर्वी Jasprit Bumrah ला मोठा धक्का; ऋषभ पंत अन् विराट कोहली यांनाही बसलाय फटका

भारत 'अ' विरूद्ध ऑस्ट्रेलिया 'अ' वेळापत्रक

३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर: पहिला सामना, (मॅके)

७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर: दुसरा सामना, (मेलबर्न)

१५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर : भारत 'अ' विरूद्ध भारत (पर्थ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.