IND vs BAN: १८ वी कसोटी मालिका अन् १८० व्या सामन्यात विजय! टीम इंडियासाठी कानपूर सामना ठरला विक्रमी

India 18th consecutive Test series wins at home: भारताने बांगलादेशविरुद्ध कानपूरला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अवघ्या ५२ षटकातच फलंदाजी करत विजय मिळवला असून मालिकाही जिंकली. भारतासाठी हा विजय विक्रमी ठरला आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India vs Bangladest Test Series Record: भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (१ ऑक्टोबर) बांगलादेश संघाविरुद्ध कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयमाबरोबरच भारताने मालिकाही २-० फरकाने जिंकली आहे.

दरम्यान, जरी या सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी लागला असला तरी भारताने खरंतर अवघ्या दोन दिवसातच हा सामना जिंकला आहे. कारण पहिल्या दिवशी पावलामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झालेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही, तर तिसऱ्या दिवशी मैदान न सुकल्याने खेळ होऊ शकला नव्हता.

यानंतरही चौथ्या दिवशी मैदानात उतरत भारतीय संघाने निकाल लावण्याच्या दृष्टीने गोलंदाजी आणि फलंदाजी केली आणि अखेर पाचव्या दिवसाच्या दुसऱ्याच सत्रात भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Team India
IND vs BAN, Video: रवींद्र जडेजा आशियाई 'सर'! असा पराक्रम जो कोणालाच नाही जमला, तो जड्डूने केला

विशेष म्हणजे भारताने या सामन्यात केवळ ३१२ चेंडू म्हणजे ५२ षटकेच फलंदाजी करताना विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात ३४.४ षटके आणि दुसऱ्या डावात १७.२ षटके फलंदाजी केली. त्यामुळे कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून सर्वात कमी चेंडूत फलंदाजी करत विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघाने चौथे स्थानही मिळवले आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही भारतीय संघ आहे. भारताने २०२४ मध्येच केप टाऊनला झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ २८१ चेंडूवर फलंदाजी करताना विजय मिळवला होता.

या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंड असून त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध १९३५ मध्ये २७६ चेंडूच फलंदाजी करताना विजय मिळवला होता. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेने २००५ साली झिम्बाब्वेविरुद्ध केपटाऊनमध्ये ३०० चेंडू फलंदाजी करताना विजय मिळवला होता.

Team India
IND vs BAN, 2nd Test: वरूण राजानंतर टीम इंडियाकडून 'वर्ल्ड रेकॉर्ड्स'ची बरसात! एकाच दिवशी १८ विकेट्स अन् ट्वेंटी-२० स्टाईल बॅटिंग

दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे

भारताने कानपूरला मिळवलेला विजय कसोटी क्रिकेटमधील १८० वा विजय ठरला. त्यामुळे कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत चौथा क्रमांक मिळवला आहे.

भारताने ५८१ कसोटी सामन्यांमध्ये १८० विजय मिळवले आहेत, तर १७८ पराभव स्वीकारले आहेत. भारताचे २२२ सामने अनिर्णत राहिले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. दक्षिण आफ्रिकेने १७९ कसोटी विजय मिळवले आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर ४१४ कसोटी विजयांसह ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे, तसेच इंग्लंड ३९७ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज असून त्यांनी आत्तापर्यंत १८३ विजय मिळवले आहेत.

Team India
IND vs BAN, Test: Rohit Sharma चा मास्टरस्ट्रोक, टीम इंडियाचा मालिका विजय! बांगलादेशला पावसाची साथ मिळाली, तरीही....

भारताने मायदेशात सलग १८ वी मालिका जिंकली आहे. यापूर्वी भारताने २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात अखेरीस कसोटी मालिकेत पराभव स्विकारला होता. त्यानंतर २०१३ पासून भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका अद्याप हरलेली नाही.

त्यामुळे मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत अव्वल क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने १९९४ ते २००० दरम्यान त्यांच्या मायदेशात सलग १० कसोटी विजय मिळवले होते.

या सामन्यात बांगलादेशला पहिल्या डावात ७४.२ षटकात २३३ धावाच करता आल्या. त्यानंतर भारताने आक्रमक खेळताना ३४.४ षटकात ९ बाद बाद २८५ धावांवर पहिला डाव घोषित केला आणि ५२ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात बांगलादेशला ४७ षटकात सर्वबाद १४६ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतासमोर फक्त ९५ धावांचे लक्ष्य राहिले. भारताने हे लक्ष्य १७.२ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.