Emerging Asia Cup: बदोनीचा फ्लाईंग कॅच, तर रसिक सलामची अफलातून गोलंदाजी! भारताचा UAE विरुद्ध मोठा विजय

India A vs UAE: इमर्जिंग आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत तिलक वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय अ संघाने सलग दुसरा विजय मिळवला. युएईविरुद्ध झालेल्या सामन्यात आयुष बदोनीने हवेत सूर मारत घेतलेल्या झेलने सर्वांचेच लक्ष्य वेधले. तसेच अभिषेक शर्मानेही दमदार अर्धशतक केले.
India A | T20 Emerging Teams Asia Cup 2024
India A | T20 Emerging Teams Asia Cup 2024 Sakal
Updated on

T20 Emerging Teams Asia Cup 2024: इमर्जिंग आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत तिलक वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय अ संघाने सोमवारी (२१ ऑक्टोबर) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

सोमवारी भारतीय अ संघाने संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाला ७ विकेट्सने पराभूत केलं. याआधी भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तान अ संघाचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाने दावेदारी ठोकली आहे.

सोमवारी झालेल्या सामन्यात युएईने भारतासमोर १०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्षाच्या पाठलाग भारताने अवघ्या १०.५ षटकात तीन विकेट गमावत सहज पूर्ण केला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून प्रभसिमरन सिंग आणि अभिषेक शर्मा उतरले होते. पण प्रभसिमरनने ८ धावांवर विकेट गमावली. त्याला ओमिद रेहमानने बाद केले.

India A | T20 Emerging Teams Asia Cup 2024
IND vs UAE : Rasikh Salam ने ५ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या; राहुल चोप्रा भारताला नडला तरीही UAE चा संघ १६.५ षटकांत तंबूत परतला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.