तिलक वर्मा टीम इंडियाचा कर्णधार! Emerging Teams Asia Cup साठी झाली भारतीय संघाची घोषणा; पाकिस्तानविरुद्ध पहिलाच सामना

India A Squad for Emerging Teams Asia Cup 2024: १८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Tilak Varma India A Captain
Tilak VarmaX/BCCI
Updated on

Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024: भारतीय क्रिकेट संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त असतानाच आता १८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये टी२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत भारताचा अ संघ सहभागी होणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय अ संघाची घोषणाही झाली आहे. या संघाचे कर्णधारपद तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे. तिलक वर्माकडे भारताचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही गेल्या काही काळात शानदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, ओमानला होणाऱ्या एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, अनुज रावत, नेहाल वढेरा, रसिख सलाम अशा खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय राहुल चाहर आणि साई किशोर या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.

Tilak Varma India A Captain
Women's Asia Cup 2024: श्रीलंकेने जिंकली ट्रॉफी! फायनलमध्ये गतविजेत्या टीम इंडियाला पाजले पराभवाचे पाणी

या स्पर्धेत भारतासह बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांचेही अ संघ सहभागी होणार आहेत. तसेच युएई, ओमान आणि हाँग काँग या संघांचे प्रमुख राष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत.

भारतीय अ संघाचा समावेश साखळी फेरीसाठी बी ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये पाकिस्तान अ संघ, युएई आणि ओमान या संघांचा समावेश आहे. ए ग्रुपमध्ये बांगलादेश अ संघ, हाँग काँग, श्रीलंका अ संघ आणि अफगाणिस्तान अ संघ यांचा समावेश आहे. या दोन्ही ग्रुपमधून साखळी फेरीनंतर प्रत्येकी अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

पहिला सामना १८ ऑक्टोबर रोजी बांगलादेश अ विरुद्ध हाँग काँग यांच्यात खेळवला जाईल. याचदिवशी दुसरा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या अ संघांमध्ये होणार आहे.

भारतीय अ संघ पहिलाच सामना १९ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २७ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधी २५ ऑक्टोबर रोजी दोन्ही सेमीफायनल सामने होतील.

Tilak Varma India A Captain
Asia Cup सोबत भारतीय महिलांना ६ लाख १८ हजारही गमवावे लागले; जाणून घ्या नेमका ट्विस्ट
असा आहे भारतीय अ संघ
तिलक वर्मा (कर्णधार), अनुज रावत, आकिब खान, अभिषेक शर्मा, प्रभ सिमरन सिंग, वैभव अरोरा, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिख सलाम, निशांत सिंधू, अंशुल कंभोज, साई किशोर, रमनदीप सिंग, हृतिक शोकीन,राहुल चाहर

भारतीय संघाचे सामने

  • १९ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (वेळ - सध्या. ७ वाजता)

  • २१ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध युएई (वेळ - संध्या. ७ वाजता)

  • २३ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध ओमान (वेळ - संध्या. ७ वाजता)

बाद फेरीचे सामने -

  • २५ ऑक्टोबर - पहिली सेमीफायनल - (वेळ - दु. २.३० वाजता)

  • २५ ऑक्टोबर - दुसरी सेमीफायनल - (वेळ - संध्या. ७ वाजता)

  • २७ ऑक्टोबर - अंतिम सामना (वेळ - संध्या. ७ वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.