IND A vs AUS A : ऑस्ट्रेलियन अंपायर रडके! आधी चेंडू छेडछाडीचा आरोप अन् आता भारतीय गोलंदाजांवर अन्याय

India A players in scanner again for ball-related incident: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेलल्या भारतीय अ संघावर पहिल्या चार दिवसीय सामन्यात चेंडू छेडछाडीचा आरोप झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाबाबत चेंडूची समस्या झाल्याचे दिसून आले.
India A vs Australia A Viral Video
India A vs Australia A Viral VideoSakal
Updated on

India A vs Australia A four Day Match: भारतीय अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दुसरा चार दिवसीय सामना खेळत आहे. दरम्यान, या सामन्यात चेंडूच्याबाबत काहीतरी समस्या झाल्याचे दिसून आहे, ज्याबद्दल भारतीय खेळाडू अंपायर्सशी बोलतानाही दिसले.

खरंतर ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्धच्या पहिल्या चार दिवसीय सामन्यादरम्यानही भारतीय अ संघासाठी चेंडूची समस्या झाली होती, इतकंच नाही, तर चेंडू छेडछाडीचा आरोपही झाला होता.

मॅके येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी करत असताना अखेरच्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वीच चेंडू बदलण्यात आला होता. त्यावेळी स्टंप माईकमध्ये अंपायर शॉन क्रेग हे भारतीय खेळाडूंशी बोलताना आढळले होते की चेंडू कुरतडल्याने तो बदलण्यात आला आहे, यावर अधिक चर्चा नको. चेंडू बदलल्याने भारतीय खेळाडूंनी नाराजीही व्यक्त केली होती.

India A vs Australia A Viral Video
IND A vs AUS A : ढेंग्याखालून क्लिन बोल्ड! KL Rahul ची विचित्र विकेट अन् टीम इंडियाचा निम्मा संघ ५६ धावांत तंबूत Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.