IND vs AUS : पर्थ येथील कसोटीने मालिकेचा श्रीगणेशा ; भारत-ऑस्ट्रेलियामध्ये २२ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांचा थरार

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून, दोन देशांमधील पहिला कसोटी सामना पर्थ येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मोसमाची सुरुवात दरवर्षी ॲडलेड येथील कसोटीने केली जाते. मात्र; या वर्षी पर्थ येथे कसोटी मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे.
IND vs AUS
IND vs AUSsakal
Updated on

मेलबर्न : भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून, दोन देशांमधील पहिला कसोटी सामना पर्थ येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मोसमाची सुरुवात दरवर्षी ॲडलेड येथील कसोटीने केली जाते. मात्र; या वर्षी पर्थ येथे कसोटी मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे.

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पर्थ येथील ऑप्टस स्टेडियममध्ये २२ ते २६ नोव्हेंबर या दरम्यान पहिला कसोटी सामना रंगेल. त्यानंतर दोन्ही संघ ६ ते १० डिसेंबरदरम्यान होणार असलेल्या ॲडलेड येथील कसोटीसाठी सज्ज होतील. दोन देशांमधील हा कसोटी सामना प्रकाशझोतातील (डे-नाईट) असणार आहे. ब्रिस्बेनमध्ये १४ ते १८ डिसेंबरदरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येईल. बॉक्सिंग डे या नावाने ओळखली जाणारी कसोटी दरवर्षीप्रमाणे मेलबर्न येथे २६ ते ३० डिसेंबरदरम्यान पार पडेल. दोन देशांमधील अखेरचा कसोटी सामना सिडनी येथे २०२५च्या सुरुवातीला अर्थातच ३ ते ७ जानेवारीदरम्यान होईल.

IND vs AUS
IPL 2024 Virat Kohli : टी-२० क्रिकेट खेळण्याची क्षमता ; विंडीजमधील विश्‍वकरंडक खेळण्याचे संकेत

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामधील मालिकेचा ॲडलेड येथील कसोटीने श्रीगणेशा होणार होता; मात्र ऑस्ट्रेलियन संघातील क्रिकेटपटूंच्या सल्ल्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वेळापत्रक तयार करताना पर्थ या स्थळाला प्राधान्य देण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मालिकेचा कार्यक्रम ठरवणारे प्रमुख पीटर रोच या वेळी म्हणाले, ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी पर्थ किंवा ब्रिस्बेन या स्थळांना प्राधान्य दिले. तेथील खेळपट्टी ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी पोषक आहे. पर्थ येथील नव्या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने चारही कसोटी सामने जिंकले आहेत. ब्रिस्बेन येथेही ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्यामुळे भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला कसोटी सामना पर्थ येथे हलवण्यात आला. तसेच ॲडलेड येथील फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर प्रकाशझोतातील कसोटी खेळण्यासही खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ

  • दुसरी कसोटी - ६ ते १० डिसेंबर, ॲडलेड

  • तिसरी कसोटी - १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बेन

  • चौथी कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न

  • पाचवी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, सिडनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.