Duleep Trophy India B vs India C: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत इंडिया बी आणि इंडिया सी हे दोन संघ अंतनपूर येथे आमने-सामने आहेत. रविवारी या सामन्याचा अखेरचा दिवस आहे. या सामन्यात २३ वर्षीय अंशुल कभोजन कमालीची गोलंदाजी केली आहे. वेगवान गोलंदाज असलेल्या अंशुलने या सामन्यातील पहिल्या डावात तब्बल ८ विकेट्स घेतल्या.
दुलीप ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या इंडिया सी संघाकडून अंशुल खेळत आहे. त्याने इंडिया बी संघाला त्यांच्या पहिल्याच डावात हैराण केले. त्याने २७.५ षटके गोलंदाजी करताना ८ षटके निर्धाव टाकली. याशिवाय ६९ धावा खर्च करत ८ विकेट्स घेतल्या.
त्याने इंडिया बी संघातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या खेळाडूंना बाद केले. विशेष म्हणजे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती.