IND vs PAK: भारतासमोर शेजाऱ्यांची शरणागती; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मिळवला विजय

ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध पहिल्या सामन्यात भारताने ७ धावांनी बाजी मारली.
india vs pakistan
india vs pakistan esakal
Updated on

India vs Pakistan ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup: भारतीय संघाने ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. ७ धावांनी विजय मिळवून भारताने स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत 'अ' संघाने Pakistan Shaheens संघाला धुतले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सालामीवीर अभिषेक शर्मा व प्रभ सिमरन सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात अभिषेक शर्मा (३५) झेलबाद झाला. प्रभसिमरन सिंग (३६) देखील माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याला नेहाल वढेराची साथ मिळाली आणि १२ व्या षटकात भारताची धावसंख्या १०० पार पोहोचवली. १४ व्या षटकात वधेरा (२५) बाद झाला, तर आयुष बदोनी (२) धावा करू शकला.

१९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कर्णधार तिलक (४४) बाद झाला आणि भारताच्या खेळीला ब्रेक लागला. त्यानंतरच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगीरी करता आली नाही. भारताने २० षटकांत १८३ धावा धावफलकावर लावल्या.

भारताच्या १८३ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या पाकिस्तानने पहिल्याच षटकात विकेट गमवली. अंशुल कंबोजने पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद हॅरीसला त्रिफळाचीत केले. यासिर खानने पाकिस्तानची एक बाजू लावून धरली, परंतु दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. यासिर व कासिम अक्रमच्या जोडीने ५४ धावांची भागीदारी केली. पण, ९व्या षटकात यासिरला (३३) रमनदीप सिंग सुंदर एकहाती झेल करत बाद केले. त्याच षटकात कासिमही (२७) बाद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.