ICC ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारत आणि श्रीलंकेच्या सलामीवीरांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
भारत आणि श्रीलंका संघात नुकतीच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वनडे मालिका झाली, ज्यात श्रीलंकेने २-० अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने ३ सामन्यांत १५७ धावा केल्या, तर श्रीलंकेचा सलामीवीर पाथम निसंकाने १०१ धावा केल्या.
त्यामुळे रोहित आता त्याचा साथीदार शुभमन गिलला मागे टाकत ७६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गिल ७६३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय विराट कोहली ७४६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.