Rohit Sharma: 'कर्णधार झाल्यापासून मी...', टी20 वर्ल्ड कपपूर्वी नेतृत्वच्या आव्हानाबद्दल काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma on Captaincy: रोहित शर्माने कर्णधार म्हणून येणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानाबद्दल भाष्य केले आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

Rohit Sharma on Captaincy: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जूनमध्ये खेळवली जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार असलेल्या या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने नेतृत्व करताना येणाऱ्या आव्हानांबद्दल भाष्य केलं आहे.

रोहित आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने नेतृत्वाबद्दल बोलताना म्हटले आहे की सर्व खेळाडूंना सांभाळण्याचे सर्वात मोठे आव्हान असते.

Rohit Sharma
Shah Rukh Khan: 'माझे खेळाडू...माझी टीम...' KKR च्या विजयानंतर दोन दिवसांची शाहरुखची भावुक पोस्ट

तो स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, 'कोणत्याही कर्णधारासाठी सर्वात मोठे आव्हान वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाडूंना हाताळणे हेच असते. कारण प्रत्येक खेळाडू वेगळा असतो, त्याचे त्याचे वेगळे विचार असतात आणि वेगळ्या मागण्या असतात. कर्णधार यावेळी काय करू शकतो, तर सर्व गोष्टी समजून त्यानुसार त्याला व्यक्त व्हावे लागते.'

'मी कर्णधार झाल्यापासून मी शिकलो आहे की कर्णधाराने प्रत्येक खेळाडूला समान महत्त्व द्यायला पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाला ते संघाचा महत्त्वाचा भाग असल्यासारखे वाटते.'

'जेव्हा कोणी काही समस्या घेऊन तुमच्याकडे येते, तेव्हा तुम्ही ते नीट ऐकले पाहिले आणि योग्य उपाय सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटते की मला फक्त कर्णधार म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणूही तयारी करावी लागते.'

तसेच रोहितने असेही म्हटले की त्याची नेतृत्व करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तो म्हणाला, 'माझा नेतृत्वाबाबत वेगळा दृष्टीकोन आहे. माझा डेटाच्या अधारावर केलेल्या विश्वेषणावर आणि नवीन ट्रेंड समजून घेण्यावर विश्वास आहे.'

'मी खूप वेळ मिटिंग रुममध्ये असतो आणि सामन्यात निर्माण होऊ शकणाऱ्या काही निश्चित परिस्थितींसाठी मला तयार करत असतो. हे खेळाडूंसाठी नसते, तर माझ्यासाठी असते. कारण मला या परिस्थितींची जाणीव हवी, कारण जेव्हा मैदानात येऊ तेव्हा मी उत्तरांसह तयार असायला हवे.'

'मी अशीच तयारी करतो, मी सर्व गोष्टींचा विचार करतो. जर मला असं वाटलं की काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मी खेळाडूंबरोबरही शेअर करायला हव्यात, तर मी तसं करतो. पण माझ्यासाठी मी पूर्ण तयारी करून जातो. मी प्रतिस्पर्धी संघ सध्या कसा खेळतोय, हे देखील पाहातो.'

Rohit Sharma
Rohit Sharma: 'रोहितने मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना खेळलाय...', माजी क्रिकेटपटूची खळबळजनक प्रतिक्रिया

रोहित पुढे म्हणाला, 'टी20 क्रिकेट बदलत आहे, प्रत्येक खेळाडू वेगळ्याप्रकारे खेळत आहे. तुम्हाला त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीला समजून घ्यावे लागते. त्यानुसार आम्ही फलंदाज आणि गोलंदाजांना योजना आखण्यास सांगतो. म्हणजे मी आधी माहिती घेतो आणि माझ्या संघसहकाऱ्यांना सांगतो.'

सध्या रोहित भारतीय संघासह अमेरिकेत आहे. भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपची तयारी करत आहे. भारताला 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. त्यानंतर 5 जूनला भारताला टी20 वर्ल्डकपचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.