WTC 25 Points Table : इंग्लंडविरुद्ध भारताची विजयी हॅट्ट्रिक; न्यूझीलंड संघात पसरली घबराट, कशी आहे पॉइंट टेबलची स्थिती?

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी इंग्लंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला आणि....
WTC 25 Points Table Marathi News
WTC 25 Points Table Marathi Newssakal
Updated on

WTC 25 Points Table : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी इंग्लंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले दुसरे स्थान कायम राखले. न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. पण भारतीय संघाने मालिकेतील शेवटचा सामना जिंकला तर पहिल्या स्थानावर जाऊ शकतो. त्यामुळे न्यूझीलंड संघात घबराट पसरली आहे.

WTC 25 Points Table Marathi News
मुंबई उपांत्य फेरीच्या दिशेने...! मात्र कर्णधार रहाणेचा खराब फॉर्म कायम; हार्दिकची शतकी खेळी

भारतीय संघाने पाचव्या विजयासह ६२ गुणांची कमाई केली असून विजयाची टक्केवारी ६४.५८ इतकी आहे. एकीकडे भारतीय संघ अव्वल दोन संघांमध्ये कायम राहण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत असतानाच दुसरीकडे मात्र इंग्लंडचा संघ आठव्या स्थानावर आहे. नऊ सामन्यांमधून त्यांना फक्त तीनच लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे. पाच लढतींत त्यांचा पराभव झाला आहे. २१ गुणांचीच कमाई त्यांना करता आली आहे.

WTC 25 Points Table Marathi News
Mohammed Shami Surgery: शमीनं हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर, नेमकं काय झालंय? सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट

आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धा (ताजी गुणतालिका)

१) न्यूझीलंड - ३६ गुण, ७५ टक्केवारी (चार सामने, तीन विजय, एक पराभव)

२) भारत - ६२ गुण, ६४.५८ टक्केवारी (आठ सामने, पाच विजय, दोन पराभव, एक अनिर्णित)

३) ऑस्ट्रेलिया - ६६ गुण, ५५ टक्केवारी (दहा सामने, सहा विजय, तीन पराभव, एक अनिर्णित)

४) बांगलादेश - १२ गुण, ५० टक्केवारी (दोन सामने, एक विजय, एक पराभव)

५) पाकिस्तान - २२ गुण, ३६.६६ टक्केवारी (पाच सामने, दोन विजय, तीन पराभव)

६) वेस्ट इंडीज - १६ गुण, ३३.३३ टक्केवारी (चार सामने, एक विजय, दोन पराभव, एक अनिर्णित)

७) दक्षिण आफ्रिका - १२ गुण, २५ टक्केवारी (चार सामने, एक विजय, तीन पराभव)

८) इंग्लंड - २१ गुण, १९.४४ टक्केवारी (नऊ सामने, तीन विजय, पाच पराभव, एक अनिर्णित)

९) श्रीलंका - ० गुण, ० टक्केवारी (दोन सामने, दोन पराभव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.