India cricket schedule 2024 : श्रीलंकेकडून हरले, आता पुढे काय? गौतमच्या टीम इंडियाचे 'गंभीर' वेळापत्रक, एका क्लिकवर

Team India Upcoming Matches - गौतम गंभीर टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघ पहिल्याच दौऱ्यासाठी श्रीलंकेत गेला. ट्वेंटी-२० मालिका जिंकली, परंतु वन डेत सपाटून मार खाल्ला.
Team India Schedule 2024-25
Team India Schedule 2024-25esakal
Updated on

India Cricket Schedule 2024-25 check list : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात बरेच बदल पाहायला मिळाले. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे गेले, शुभमन गिल हा वन डे व ट्वेंटी-२० अशा दोन्ही संघांचा उपकर्णधार बनला. सर्वात महत्त्वाचे राहुल द्रविडनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीरकडे ( Gautam Gambhir) आली.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता, परंतु शुभमनच्या नेतृत्वाखालील संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून व्ही व्ही एस लक्ष्मणने काम पाहिले. त्यानंतर गौतम गंभीरने पदभार स्वीकारला आणि टीम इंडिया श्रीलंकेत पोहोचली. ट्वेंटी-२० मालिकेत भारताने ३-० असा दणदणीत विजय मिळवला. त्यानंतरच्या वन डे मालिकेसाठी रोहित, विराट हे अनुभवी खेळाडू श्रीलंकेत दाखल झाले. मात्र, भारताला ०-२ असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.

भारतीय क्रिकेट संघ पुढे केव्हा खेळणार?

भारतीय क्रिकेटपटूंना पुन्हा मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांना बरीच वाट पाहावी लागणार आहे. भारताची पुढची आंतरराष्ट्रीय मॅच १९ सप्टेंबरला होणार आहे आणि त्यानंतर मालिकांचा धडाला लागणार आहे. पण, तुर्तास तरी ४२ दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी काहीच नाही.

बांगलादेशचा भारत दौरा ( Bangladesh's Tour Of India 2024)

  • भारत वि. बांगलादेश, पहिली कसोटी: १९-२३ सप्टेंबर, चेन्नई

  • भारत वि. बांगलादेश, दुसरी कसोटी: २७ सप्टेंबर ते ऑक्टोबर, कानपूर

    ट्वेंटी-२० मालिका

  • भारत वि. बांगलादेश, पहिली ट्वेंटी-२०: ६ ऑक्टोबर, धर्मशालला

  • भारत वि. बांगलादेश, दुसरी ट्वेंटी-२०: ९ ऑक्टोबर, दिल्ली

  • भारत वि. बांगलादेश, तिसरी ट्वेंटी-२०: १२ ऑक्टोबर, हैदराबाद

न्यूझीलंडचा भारत दौरा ( New Zealand's Tour Of India Test Series 2024)

  • भारत वि. न्यूझीलंड, पहिली कसोटी: १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरू

  • भारत वि.न्यूझीलंड, दुसरी कसोटी: २४ ते २८ ऑक्टोबर, पुणे

  • भारत वि. न्यूझीलंड, तिसरी कसोटी: १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा ( India vs South Africa T20I Series 2024)

  • भारत वि. दक्षिण आफ्रिका, पहिली ट्वेंटी-२०: ८ नोव्हेंबर, डर्बन

  • भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुसरी ट्वेंटी-२०: १० नोव्हेंबर, गॅबेर्हा

  • भारत वि. दक्षिण आफ्रिका, तिसरी ट्वेंटी-२०: १३ नोव्हेंबर, सेंच्युरियन

  • भारत वि. दक्षिण आफ्रिका, चौथी ट्वेंटी-२०: १६ नोव्हेंबर, जोहान्सबर्ग

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ( India vs Australia, Border-Gavaskar Trophy 2024-25)

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी: ६ ते १० डिसेंबर, एडिलेड

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बेन

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी: २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, पाचवी कसोटी: ३ ते ७ जानेवारी, २०२५, सिडनी

१९९१-९२ नंतर प्रथमच दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

इंग्लंडचा भारत दौरा ( England's Tour of India 2025)

  • भारत वि. इंग्लंड, पहिली ट्वेंटी-२०: २२ जानेवारी, चेन्नई

  • भारत वि. इंग्लंड, दुसरी ट्वेंटी-२०: २५ जानेवारी, कोलकाता

  • भारत वि. इंग्लंड, तिसरी ट्वेंटी-२०: २८ जानेवारी, राजकोट

  • भारत वि. इंग्लंड, चौथी ट्वेंटी-२०: ३१ जानेवारी, पुणे

  • भारत वि. इंग्लंड, पाचवी ट्वेंटी-२०: २ फेब्रुवारी, मुंबई

  • भारत वि. इंग्लंड, पहिली वन डे: ६ फेब्रुवारी, नागपूर

  • भारत वि. इंग्लंड, दुसरी वन डे: ९ फेब्रुवारी, कटक

  • भारत वि. इंग्लंड, तिसरी वन डे: १२ फेब्रुवारी, अहमदाबाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.