Archery World Cup Final भारताच्या दीपिका कुमारीला 'रौप्य' यश; जिंकलं स्पर्धेतील सहावं मेडल

Deepika Kumari Sixth Medal in Archery World Cup Final: भारताची दिग्गज तिरंदाज दीपिका कुमारीने सहाव्यांदा तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलमध्ये मेडल जिंकले आहे.
Deepika Kumari
Deepika KumariSakal
Updated on

Archery World Cup Final: मेक्सिकोमध्ये नुकतेच तिरंदाजी वर्ल्ड कप फायनल पार पडली. या स्पर्धेत भारताची दिग्गज तिरंदाज दीपिका कुमारीने चमकदार कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली. हे तिचे तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलमधील कारकिर्दीतील एकूण सहावे पदक ठरले आहे.

तिला रविवारी (२० ऑक्टोबर) अंतिम सामन्यात चीनच्या ली जियामनने ६-० अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे दीपिकाला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही, पण तिने रौप्य पदक नावावर केले. ली जियामनने पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग घेतलेला आणि तिने पहिल्या प्रयत्नात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Deepika Kumari
Sheetal Devi: हात नाही? काही प्रॉब्लेम नाही...! शीतल देवीची पायाने तिरंदाजी अन् World Record; १ गुणाने हुकले अव्वल स्थान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.