IND vs BAN 1st T20I : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; पाकिस्तानशी केली बरोबरी

Team India beat Bangladesh 1st T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
IND vs BAN 1st T20I
IND vs BAN 1st T20Iesakal
Updated on

India vs Bangladesh 1st T20I: भारतीय संघाने ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील आपला दबदबा कायम राखताना बांगलादेशला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स राखून नमवले. भारताने तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा भारताचा ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील सलग १२ वा विजय ठरला आहे. ग्वालियरच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

अर्शदीप सिंग ( ३-१४) व वरुण चक्रवर्थी ( ३-३१) यांनी प्रभावी गोलंदाजी करून बांगलादेशचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १२७ धावांत माघारी पाठवला. हार्दिक पांड्या, मयांक यादव व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मेहिदी हसन मिराज याने नाबाद ३५ व कर्णधार नजमूल शांतोच्या २७ धावांनी बांगलादेशची लाज राखली. भारताने हे माफक लक्ष्य ११.५ षटकांत ३ बाद १३२ धावा करून पार केले. संजू सॅमसनने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा ७ चेंडूंत १६ आणि सूर्यकुमार १४ चेंडूंत २९ धावा करून माघारी परतले. नितीश कुमार रेड्डीने नाबाद १६ धावा केल्या, तर हार्दिकने १६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३९ धावांनी खेळी केली.

IND vs BAN 1st T20I
IND vs BAN: मयंक, नितीशच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे IPL फ्रँचायझींच्या खिशाला पडणार खड्डा; कसा ते जाणून घ्या

पाकिस्तानच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

भारताने या विजयासह पाकिस्तानच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्रतिस्पर्धी संघांना ऑल आऊट करण्याचा विक्रम भारताने संयुक्तपणे नावावर केला. भारत आणि पाकिस्तान यांनी ट्वेंटी-२०त प्रत्येकी ४२ वेळा प्रतिस्पर्धी संघांना ऑल आऊट केले आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा ( ४०) क्रमांक येतो. युगांडा व वेस्ट इंडिज यांनी अनुक्रमे ३५ व ३२ वेळा अशी कामगिरी केली आहे.

भारताने सलग १२ ट्वेंटी-२० सामन्यांत ( सुपर ओव्हरच्या निकालासह) विजय मिळवताना स्वतःच्याच नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये नोंदवलेल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताचा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील १०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याचा विक्रम काल भारताने केला. काल भारताने ४९ चेंडू राखून मॅच जिंकली. यापूर्वी २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेच्या १०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारताने ४१ चेंडू राखून केला होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.