ICC Test Ranking: बुमराहने अश्विनला मागे टाकत पटकावला पहिला नंबर! जैस्वाल-विराटनेही घेतली मोठी झेप

Bumrah overtakes Ashwin to regains No.1 spot in Test ranking: भारताने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत २-० फरकाने विजय मिळवला. या मालिकेनंतर आता आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून बुमराहने अश्विनला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
Jasprit Bumrah - R Ashwin | ICC test Ranking
Jasprit Bumrah - R Ashwin | ICC test RankingX/ICC
Updated on

ICC Test Rankings: भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच मंगळवारी (१ ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत २-० फरकाने विजय मिळवला. या मालिकेत भारतीय संघाच्या जसप्रीत बुमराह, विराट कोहली, आर अश्विन, यशस्वी जैस्वाल अशा अनेक खेळाडूंची कामगिरी चांगली झाली आहे.

त्यामुळे त्यांना आता कसोटी क्रमवारीत त्याचा फायदाही झाला आहे. आयसीसीने बुधवारी (२ ऑक्टोबर) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.

या ताज्या क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत भारताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फिरकीपटू आर अश्विनला मागे टाकले आहे. आता बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला आहे. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या दोघांनीही बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी ११ विकेट्स घेतल्या.

Jasprit Bumrah - R Ashwin | ICC test Ranking
IND vs BAN: १८ वी कसोटी मालिका अन् १८० व्या सामन्यात विजय! टीम इंडियासाठी कानपूर सामना ठरला विक्रमी

तसेच जोश हेजलवूड तिसऱ्या आणि पॅट कमिन्स चौथ्या क्रमांकावर कायम आहे. कमिन्सबरोबर कागिसो रबाडाही चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा रविंद्र जडेजाही पहिल्या १० मध्ये असून तो सहाव्या क्रमांकावर कायम आहे.

याशिवाय श्रीलंकेचा प्रभात जयसूर्याही सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध अफलातून कामगिरी केली. भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी करणाऱ्या मेहदी हसननेही चार स्थानांची झेप घेत १८ वा क्रमांक मिळवला आहे.

फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वालने कानपूर कसोटीत ७२ आणि ५१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे आता तो दोन स्थानांची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्यापुढे अव्वल क्रमांकावर जो रुट आणि दुसऱ्या क्रमांकावर केन विलियम्सन आहे.

Jasprit Bumrah - R Ashwin | ICC test Ranking
ICC Test Ranking : टाइगर का हुकुम... पुन्हा एकदा अश्विन बनला 'नंबर १'; रोहित अन् जैस्वालचीही 'यशस्वी' झेप

तसेच विराटनेही कानपूर कसोटीत ४७ आणि नाबाद २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे त्यानेही तब्बल ६ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे तो टॉप-१० मध्ये आला आहे. तो आता ६ व्या क्रमांकावर आला आहे. मात्र ऋषभ पंत ९ व्या क्रमांकावर घसरला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक ठोकणाऱ्या श्रीलंकेच्या कामिंडू मेंडिसने ५ स्थानांची गरुड झेप घेतली असून तो आता ११ व्या क्रमांकावर आला आहे. मात्र बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत फारशी चांगली कामगिरी न झाल्याने रोहित शर्मा ५ स्थानांची घसरला असून १५ व्या क्रमांकावर आला आहे, तर शुभमन गिल २ स्थानांनी खाली घसरून १६ व्या क्रमांकावर आला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा अव्वल क्रमांकावर आणि आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.