T20 World Cup 2024: झहीर खानच्या टीम इंडियात एकच विकेट-किपर, तर तीन ऑल-राऊंडर; जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना दिली संधी

Team India Squad T20 WC24 : आगामी टी20 वर्ल्डकपसाठी झहीर खानने त्याचा संभाव्य भारतीय संघ जाहीर केला आहे.
Zaheer Khan | Team India
Zaheer Khan | Team IndiaSakal
Updated on

T20 World Cup 2024: वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे 1 जून ते 29 जून दरम्यान टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने अनेक माजी क्रिकेटपटूंनी विविध अंदाज व्यक्त केले आहेत.

अनेकांनी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल, यावरही मत व्यक्त केले आहे. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननेही या वर्ल्डकपसाठी त्याचा संभाव्य भारतीय संघ जाहीर केला आहे.

त्याने जिओ सिनेमाशी बोलताना हा संघ निवडला आहे. त्याच्या या संघात एकच यष्टीरक्षक निवडला आहे. त्याने ही जागा ऋषभ पंतला दिली आहे. तसेच त्याच्या संघात त्याने वेगवान गोलंदाज यश दयाललाही निवडले असून यामागील कारणंही त्याने स्पष्ट केले आहे.

Zaheer Khan | Team India
Punjab Kings: 'थँक यू!', ऐतिहासिक विजयानंतर पंजाबच्या 'या' खेळाडूने अचानक सोडली संघाची साथ, कारणही आलं समोर

झहीरने सांगितले की 'मी यश दयालला घेतलं कारण त्याची जागा ही बदलणारी असू शकते. जेव्हा १५ जणांचा संघ जाहीर होईल, तेव्हा या स्पर्धेसाठी मोहम्मद शमी उपलब्ध असणार नाहीये. त्यामुळे तो असा गोलंदाज आहे, ज्याला तुम्ही खेळवू शकता.'

'तुम्हाला जर एखादा बॅकअप गोलंदाज हवा असेल, किंवा जर सिराजचा फॉर्म फारसा चांगला नसेल, तरी यश दयालला वापराता येऊ शकते.'

याशिवाय एकाच यष्टीरक्षकाला घेण्याबाबत झहीर म्हणाला, 'ऋषभ पंत हा एकच माझा यष्टीरक्षक संघात आहे. कारण मी चार वेगवान गोलंदाजांना संघात घेण्याला महत्त्व दिले आहे. एका जादाच्या यष्टीरक्षकासाठी मला एका वेगवान गोलंदाजाला गमवायचे नाहीये.

'तुमच्याकडे यष्टीरक्षकासाठी केएल राहुल, संजू सॅमसन हे पर्याय आहेत आणि अनेकांना दिनेश कार्तिकलाही पाहायचे आहे. याक्षणी खरंतर आपण एमएस धोनीचाही त्याच्या स्ट्राईक रेटमुळे विचार करू शकतो.'

'पण मला वाटते की निवड समिती संजू सॅमसन, केएल राहुल आण कदाचित जितेश शर्मा, अशा सध्याच्या खेळाडूंवर अधिक लक्ष देत असेल. पण तुम्ही जर एक महिना चालणाऱ्या स्पर्धेसाठी संघ तयार करणार असाल, तर तुम्ही राखीव खेळाडूंमध्ये एका यष्टीरक्षकाला घेऊ शकता.'

Zaheer Khan | Team India
'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

याशिवाय झहिरने रोहित शर्मासह सलामीसाठी दोन खेळाडूंना निवडले आहे. त्याने शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचे पर्याय ठेवले आहे. याशिवाय त्याने शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा या तीन अष्टपैलू खेळाडूंना निवडले आहे.

झहीरने गोलंदाजांच्या फळीत दयालव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांना आणि कुलदीप यादव व युजवेंद्र चहल या फिरकीपटूंना निवडले आहे. (Zaheer Khan picked up his India squad for ICC Men's T20 World Cup 2024)

टी20 वर्ल्ड कप 2024 साठी झहीर खानचा भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर्शदीप सिंग, यश दयाल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.