Shreyanka Patil Ruled Out : श्रीलंकेत टीम इंडियाचे टेन्शन वाढलं! स्टार खेळाडूच्या बोटाला फ्रॅक्चर, संघातून बाहेर

Shreyanka Patil Ruled Out Of India In Women's Asia Cup : स्टार खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेत भारतीय संघाच्या अडचणी काहीशा वाढल्या आहेत. भारतीय खेळाडूच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून त्यामुळे त्याला संघाबाहेर जावे लागले.
Shreyanka Patil Ruled Out Asia Cup
Shreyanka Patil Ruled Out Asia Cupsakal
Updated on

Shreyanka Patil Ruled Out Of India In Women's Asia Cup : भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेचे यजमानपद असलेल्या टी-20 आशिया कपमध्ये खेळत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात केली आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना 7 विकेटने जिंकला.

आता भारतीय संघाला ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. ती बोटाला फ्रॅक्चर झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. टीम इंडियाला महिला T20 आशिया कपमध्ये 21 जुलै रोजी यूएई संघाविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे.

Shreyanka Patil Ruled Out Asia Cup
IPL 2025 मध्ये कोहली-पांड्याचा पगार वाढणार? BCCI आणि IPL मालकांची बैठक

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयंका पाटीलला झेल घेताना दुखापत झाली होती. श्रेयंकाला तिच्या डाव्या हाताच्या सर्वात लहान बोटात फ्रॅक्चर झाले आहे, मात्र तरीही तिने या सामन्यात गोलंदाजी सुरूच ठेवली, 3.2 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. श्रेयंकाच्या या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानला १०८ धावांवर गुंडाळले होते.

Shreyanka Patil Ruled Out Asia Cup
ENG vs WI: बापरे! विंडीजच्या फलंदाजानं मारलेल्या सिक्सनं छतचं तोडलं, तुकडे पडले प्रेक्षकांच्या अंगावर, पाहा Video

महिला टी-20 आशियातील संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडलेल्या श्रेयंका पाटीलच्या जागी 26 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज तनुजा कंवरला स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे.

तनुजा ही महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्स संघाचा एक भाग आहे आणि तिने दुसऱ्या सत्रात तिच्या संघासाठी सर्वाधिक 10 बळी घेतले. याशिवाय, ती भारत अ महिला संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा एक भाग होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.