On This Day: भारताने २०१९ साली कसोटी क्रिकेटमध्ये केला होता हा विक्रम; ऑस्ट्रेलियाला टाकले होते मागे

Test Record on This Day : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने आजच्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला होता.
VIRAT KOHLI
VIRAT KOHLIesakal
Updated on

On This Day in Cricket: आजच्या दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोबर २०१९ रोजी भारताने कसोटी क्रिकेटमध्ये एक विक्रम रचला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १३७ धावांनी पराभव केला आणि भारत घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा संघ ठरला. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग ११ वा विजय होता. याआधी घरच्या मैदानावर सलग १० विजय मिळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा विक्रम भारताने मोडला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर २-० अशी आघाडी घेतली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने पहिल्या डावात तब्बल ६०१ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी ५ विकेट्स गमावले असताना भारताने डाव घोषित केला. या डावामध्ये कर्णधार विराट कोहलीने द्विशतकीय खेळी केली व २५७ धावांवर तो नाबाद राहिला. तर सलामीवीर मयंक अग्रवालने (१०८) शतक झळकावले. चेतेश्वर पुजारा (५८), अजिंक्य रहाणे (५९) व रविंद्र जडेजाने (९१) धावा केल्या.

VIRAT KOHLI
Ranji Trophy 2024: अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर अपयशी; गत विजेत्या मुंबईला पहिल्या डावात पिछाडी

दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजीसाठी आला. परंतु भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा डाव २७५ धावांवर गुंडाळला. कर्णधार फाफ डुप्लेसी (६४) व केशव महाराजने (७२) आफ्रिकेचा पडता डाव उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. या डावात भारतीय गोलंदाज उमेश यादव (३) व रविंद्र जडेजाने (४) विकेट्स घेतले.

आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर भारताने आफ्रिकेला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले. परंतु भारतीय गोलंदाजांसमोर पुन्हा आफ्रिकेचा निभाव लागू शकला नाही. आफ्रिकेच्या खात्यात भोपळा असतानाच अ‍ॅडम मार्करमच्या रूपाने भारताने आफ्रिला पहिला धक्का दिला आणि आफ्रिकेचा डाव घसरण्यास सुरूवात झाली. डीन एल्गरने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. पण, अर्धशतकाला २ धावांची गरज असताना अश्विनने त्याला माघारी पाठवले. उमेश यादव व रविंद्र जडेजाने प्रत्येकी ३ विकेट्स घेत याही डावात कमाल करून दाखवली. आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १८९ धावांवर संपुष्टात आला आणि पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येमुळे चौथ्या दिवशी सामना भारताने १३७ धावांनी जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.