IND vs BAN: 'फक्त वेग महत्त्वाचा नाही, तर गोलंदाजीत...', मयंक यादवने स्पष्टच सांगितलं

Mayank Yadav on Bowling: आपल्या वेगासाठी ओळखला जाणाऱ्या मयंक यादवने गोलंदाजीत कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, याबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे.
Mayank Yadav
Mayank YadavSakal
Updated on

India vs Bangladesh T20I: भारतीय क्रिकेट संघाचा २२ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय लढतीत ठसा उमटवला. त्याने रविवारी (६ ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी२० लढतीत २१ धावा देत एक फलंदाज बाद केला, तसेच एक षटक निर्धाव टाकले.

याप्रसंगी लढत संपल्यानंतर या पठ्ठ्याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, माझ्या गोलंदाजीत वेग आहे. हे मला माहीत आहे, पण आयपीएलच्या दरम्यान मला समजले की सातत्यपूर्ण कामगिरीही महत्त्वाची आहे. त्यानंतरच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते.

Mayank Yadav
IND vs BAN: मयंक यादवने आपलं नाणं खणखणीत वाजवलं! पदार्पणाच्या T20I सामन्यातच केली १८ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी

मयंक यादव पुढे म्हणाला, चेंडूचा टप्पा व दिशा याचे क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगासह चेंडूचा टप्पा व दिशा योग्य असल्यास यश मिळवता येते. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांकडूनही आदर मिळतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मी चेंडूचा टप्पा व दिशा यावर प्रचंड मेहनत केली.

‘आयपीएल’नंतर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होतो. आता माझी भारतीय संघामध्ये निवड झाली. मी उत्साही होतो, पण चिंताही वाढली होती. कारण, तीन ते चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते, असे तो पुढे नमूद करतो.

Mayank Yadav
IND vs BAN: मयंक, नितीशच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे IPL फ्रँचायझींच्या खिशाला पडणार खड्डा; कसा ते जाणून घ्या

खेळपट्टीनुसार गोलंदाजीत बदल

खेळपट्टीनुसार गोलंदाजीत बदल करतो, असे मयंक यादव या वेळी म्हणाला. तो नमूद करतो की, ‘आयपीएल’मध्ये वेगवान चेंडूवर भर दिला. कारण, त्या वेळी हळुवार चेंडू टाकण्याची गरज नव्हती, पण ग्वाल्हेरच्या खेळपट्टीवर चेंडूंना उसळी मिळत नव्हती. त्यामुळे काही चेंडूंमध्ये बदल करावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.