Harbhajan Singh: ही अशी कसली भंकस! मानसी जोशी भडकली; हरभजन सिंग, युवराज सिंग यांना सुनावले

Harbhajan Singh apology: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स स्पर्धा जिंकल्यानंतर हरभजन सिंगने सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्यासह एक रिल सोशल मीडियावर शेअर केलं होतं, मात्र आता त्याला त्यावर माफी मागावी लागली आहे.
Suresh Raina, Yuvraj Singh, Harbhajan Singh
Suresh Raina, Yuvraj Singh, Harbhajan SinghSakal
Updated on

Manasi Joshi slams Harbhajan Singh, Suresh Raina, Yuvraj Singh: भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना आणि युवराज सिंग हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. नुकतेच हे तिघेही वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स संघाकडून खेळले. या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करत विजेतेपद जिंकले.

या विजेतेपदानंतर हरभजन सिंगने एक रिल शेअर केले होते. ज्यात हरभजनसह युवराज आणि रैनाही दिसले. त्यांनी हे रिल बॉलिवूड गाणं तौबा-तौबा यावर बनवले होते, ज्यात ते लंगडताना दिसले होते.

या रिलच्या कॅप्शनमध्ये हरभजनने लिहिले, '१५ दिवस लिजंड्स क्रिकेट खेळून शरीर तौबा-तौबा झाले. शरीराचा प्रत्येक भाग सुजला आहे. आमच्या तौबा-तौबा डान्स व्हर्जनने आम्ही विकी कौशल आणि करन अहुजा यांच्याशी स्पर्धा केली आहे. मस्त गाणं आहे.'

Suresh Raina, Yuvraj Singh, Harbhajan Singh
Rohit Sharma Video: 'अजून तरी तुम्ही...' रोहितने वनडे-कसोटी निवृत्तीबद्दल स्पष्टच दिलं उत्तर

मात्र, हे रिल अपमानजनक असल्याचे मत भारताची पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी जोशीने मांडले आहे. तिच्या म्हणण्यांनुसार या रिलमधून त्यांनी दिव्यांग व्यक्तींची चेष्टा केली आहे. यानंतर हरभजन सिंगने सर्वांची माफी मागितली आहे.

मानसी ही माजी अव्वल क्रमांकाची बॅडमिंटनपटू आहे. ती एसएल३ बॅडमिंटन श्रेणीत खेळते.

मानसीने हरभजन सिंगने शेअर केलेल्या रिलवर कमेंट केली की 'तुम्ही जर पोलिओ असलेल्या लोकांची थट्टा करत असाल, तर हे योग्य नाही. यामुळे भारतातील अपंग मुलांचा छळ होण्यासाठी लोक प्रवृत्त होतील.'

तिने पुढे लिहिले, 'तुमच्यासारख्या स्टार खेळाडूंनी जबाबदारीने वागावं असं अपेक्षित आहे. कृपया अपंग लोकांची थट्टा करू नका. हे हास्यास्पद नाही. तुम्हाला माहितीही नाही की तुमच्या अशा वागण्याने किती नुकसान होऊ शकते. लोकांकडून तुम्हाला मिळत असलेलं कौतुक धक्कादायक आहे.'

Suresh Raina, Yuvraj Singh, Harbhajan Singh
निवृत्तीतून माघार घेत David Warner खेळणार चॅम्पियन्स ट्रॉफी? निवड समिती अध्यक्षांचा खुलासा

मानसीने पुढे लिहिले, 'तुमच्या या रिलमुळे अपंग लोकांच्या चालण्याच्या पद्धतीची चेष्टा करण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन मिळू शकते. या रिलचा वापर करून अनेक जण अंपगत्व आलेल्या लहान मुलांचा छळ करू शकतात. तुमच्यापैकी कोणत्याही खेळाडूने जर अपंगांची सेवा केली असती, तर तुम्ही ही रिली केली नसती.'

'मला एकच आश्चर्य वाटते की या खेळाडूंच्या पीआर एजन्सीने सोशल मीडियावर हे रिल टाकण्याला मंजूरी कशी दिली. मी हरभजन, युवराज आणि रैना यांच्याबरोबरच या रिलला पाठिंबा देण्याऱ्यांवर खरोखर निराश आहे.'

दरम्यान, मानसीच्या या कमेंट्सवरही अनेकांनी कमेंट्स केले आहेत. काहींनी तिला पाठिंबा दिली आहे, तर काहींनी ते रिल केवळ मनोरंजन असून त्यात त्यांनी कोणाचाही अपमान केला नसल्याचे म्हटले आहे.

Manasi Joshi
Manasi JoshiInstagram

हरभजन सिंगने मागितली माफी

या सर्व प्रकरणावर हरभजन सिंगने माफी मागितली आहे. त्याने लिहिले की आम्ही इंग्लंडमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर 'तौबा तौबा' यावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याबद्दल लोक तक्रार करत आहेत, त्याबद्दलचे हे स्पष्टीकरण. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या.'

'आम्ही प्रत्येक व्यक्तीचा आणि समुदायाचा आदर राखतो आणि १५ दिवस क्रिकेट खेळल्यानंतर आमच्या शरीराचे जे हाल झाले, त्यावर हा व्हिडिओ होता.'

'शरीरावर सूज आहे आहे... आम्ही कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न करत नव्हतो. तरीही जर लोकांना असं वाटत असेल की आम्ही काही चुकीचं केलं, तर सर्वांची माफी मागतो. कृपया हे इथेच थांबवा आणि पुढे जा. आनंदी आणि निरोगी रहा, सर्वांना प्रेम.'

हरभजन सिंगने आता ते रिलही सोशल मीडियावरून डिलीट केले आहे.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.