IND vs SL 2nd ODI : भारताच्या प्लेइंग-11मध्ये होणार बदल? गंभीर-रोहित घेणार मोठा निर्णय, 'या' खेळाडूला संधी देणार

India vs Sri Lanka 2nd ODI : पहिल्या सामन्यातून मिळालेल्या धड्यातून भारतीयांना संथ खेळपट्टी आणि श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज यांचा सामना करण्यासाठी नव्या रणनीतीने खेळावे लागणार आहे.
Gautam Gambhir Rohit Sharma
Gautam Gambhir Rohit Sharmasakal
Updated on

India vs Sri Lanka 2nd ODI : पहिल्या सामन्यातून मिळालेल्या धड्यातून भारतीयांना संथ खेळपट्टी आणि श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज यांचा सामना करण्यासाठी नव्या रणनीतीने खेळावे लागणार आहे. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज लगेचच होत असल्यामुळे भारतीयांना सावध राहावे लागणार आहे.

शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बरेच चढ-उतार झाले. मुळात श्रीलंकेचा निम्मा संघ १०१ धावांत गुंडाळल्यानंतर त्यांनी २३० धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरच्या १० षटकांत ६५ धावां देताना केवळ दोनच फलंदाज बाद करता आले होते.

त्यानंतर रोहित शर्मा ट्वेन्टी-२० सारखी आक्रमक फलंदाजी करत असताना भारत हा सामना सहज जिंकणार, असे चित्र होते. १०० धावांची गरज असताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानावर होते. मात्र, त्यानंतर श्रीलंकन फिरकी गोलंदाजांनी वाट बिकट केली होती.

Gautam Gambhir Rohit Sharma
तांदुळ, चहा, गाई, कार अन् घर! ऑलिम्पिक विजेत्यांना कोणता देश किती व काय काय देतो? वाचा सविस्तर

शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी करून विजय आवाक्यात आणला; परंतु सामना बरोबरीत आणण्याची खेळी केल्यानंतर त्याला विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. सलग दोन चेंडूंत दोन फलंदाज गमावल्यामुळे सामना बरोबरीत सुटला होता.

त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यासाठी भारताला नव्या रणनीती आणि रचेनुसार खेळ करावा लागणार आहे. किमान एका फलंदाजाला तरी जास्तीत जास्त वेळ एका बाजूने उभे राहावे लागणार आहे. शुभमन गिल किंवा विराट कोहली यांच्यापैकी एकाला ही जबाबदारी घ्यावी लागेल.

Gautam Gambhir Rohit Sharma
IND vs SL : कर्णधार टेन्शनमध्ये! दुसऱ्या ODI सामन्यापूर्वीच संघाला मोठा धक्का! मॅच विनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक विजेतेपदानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रथमच मैदानात उतरले; परंतु संघाला विजय मिळाला नाही. रोहितने आपली जबाबदारी पार पाडली होती; परंतु विराट कोहलीला दुनिथ वेलालागेची डावखुरी आणि वानिंदू हसरंगाची फिरकी खेळणे कठीण जात होते. ३२ पैकी २९ चेंडू या फिरकी गोलंदाजांचे तो खेळला. अखेर हसरंगाने विराटला बाद केले.

केएल राहुल हा फिरकी गोलंदाजी खेळण्यास वाकबगार समजला जातो; परंतु जम बसल्यानंतर तोही बाद झाला. एकीकडे भारतीय फलंदाज श्रीलंकेच्या फिरकीसमोर रडतखडत असताना कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या भारतीय फिरकी गोलंदाजांना पाथून निसांका आणि वेलालागे यांनी निष्प्रभ केले. त्यामुळे या फिरकी गोलंदाजांना आज आपली क्षमता दाखवावी लागणार आहे.

Gautam Gambhir Rohit Sharma
Nishant Dev : बॉक्सिंगमध्ये पुन्हा राडा! भारतीय बॉक्सर निशांत देवसोबत झाली चीटिंग? चाहते संतापले

भारतीय फिरकीचे अपयश

पहिल्या सामन्यात भारताने शुभमन गिलसह (केवळ एक षटक) चार फिरकी गोलंदाज वापरले. त्यांनी ३० षटकांत केवळ चार विकेट मिळवताना १२६ धावा दिल्या. तर श्रीलंकेच्या फिरती गोलंदाजांनी ३७.५ षटके गोलंदाजी करताना १६७ धावा दिल्या; परंतु नऊ विकेट मिळवल्या.

पहिल्या सामन्यात आम्ही टप्प्याटप्प्यात चांगली फलंदाजी केली; परंतु मोठी भागीदारी झाली नाही आणि त्याचे दडपण अंतिम क्षणी आले, असे मत गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी सांगितले.

रियान परागला संधी मिळणार

खेळपट्टीचे स्वरूप पाहून आज भारतीय संघात एक बदल होऊ शकतो. फलंदाजी भक्कम करण्यासह फिरकी गोलंदाजीसाठी रियान परागला संधी मिळू शकते. त्यासाठी शिवम दुबे किंवा वॉशिंग्टन सुंदरला जागा रिकामी करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.