बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठीच्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील KL Rahul ची जागा आज पक्की झाली आहे. BCCI ने जाहीर केलेल्या घोषणेमुळे हे चित्र स्पष्ट झाले आहे आणि आता उर्वरित १० जागांसाठी स्पर्धा रंगलेली पाहायला मिळेल. IND vs BAN दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होतेय.
BCCI ने पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ नुकताच जाहीर केला. भीषण अपघातानंतर ऋषभ पंत जवळपास २० महिन्यानंतर कसोटी संघात परतला आहे, तर जसप्रीत बुमराहचेही पुनरागमन झाले आहे. या कसोटी संघात यश दयालला पदार्पणाची संधी मिळाली आहे आणि आकाश दीपने संघातील स्थान कायम राखले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये १६ पैकी कोणाला संधी मिळेल याच उत्सुकता आहे. अशात लोकेश राहुलचे स्थान पक्के झाले आहे.
बीसीसीआयने आज दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठीच्या संघांची घोषणा केली. पहिल्या फेरीत खेळलेले काही खेळाडू बांगलादेश कसोटीसाठी निवडले गेले आहेत. त्यामुळे लोकेशसह शुभमन गिलल, ऋषभ पंत, यश दयाल, यशस्वी जैस्वाल, आकाश दीप, अक्षर पटेल आदी खेळाडूंना रिलीज केले गेले आहे. सर्फराज खानही कसोटी संघाचा सदस्य आहे, परंतु तो दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत खेळणार आहे. १२ ते १५ सप्टेंबरला दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे.
सर्फराज दुलीप ट्रॉफीत खेळणार असल्याने लोकेश राहुलचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के मानले जात आहे. त्यात BCCIच्या सूत्रांनी लोकेशच्या समावेशाची कल्पना आधीच दिली होती. त्यांनी सांगितले होते की, भारतीय संघाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना संघ व्यवस्थापनाचे कामकाज कसे चालते, प्रणाली कशाप्रकारे कार्यरत असते, हे माहीत नसते. लोकेश राहुलने मागील ३ कसोटींमध्ये महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. दक्षिण आफ्रिकेत त्याने झळकावलेले शतक वाखाणण्याजोगे होते.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.