IND vs NZ: सिराज OUT, कुलदीप IN! टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध 'सॉलिड' प्लान; जाणून घ्या कशी असेल Playing XI

India Predicted Playing XI for 1st Test against New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरु होत आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाकोणाला संधी मिळू शकते, याचा आढावा घ्या.
Kuldeep Yadav | Mohammed Siraj
Kuldeep Yadav | Mohammed SirajSakal
Updated on

India vs New Zealand 1st Test: न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला बुधवारपासून (१६ ऑक्टोबर) भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

या मालिकेतील पहिला सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा भाग असल्याने दोन्ही संघ या मालिकेत चांगल्या कामगिरीच्या आशेने उतरतील.

भारताने याआधीच सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका २-० फरकाने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला असेल, तर दुसरीकडे न्यूझीलंडला सप्टेंबरमध्येच श्रीलंकेविरुद्ध व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांचा आता पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल.

Kuldeep Yadav | Mohammed Siraj
IND vs NZ, Test: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! लॅथमकडे नेतृत्व, तर विलियम्सन उशीराने येणार

या मालिकेसाठी भारतीय संघही पूर्ण ताकदीने उतरणार आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मालिकेपूर्वी सांगितले आहे की सामन्याची परिस्थिती आणि खेळपट्टीपाहून प्लेइंग इलेव्हन निवडण्यात येणार आहे.

दरम्यान, हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असल्याने तिथे फलंदाजांना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते. त्यामुळे दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटूंना संधी देऊ शकतात.

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंसह चायनामन कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. त्याला जर संधी दिली, तर मोहम्मद सिराज किंवा आकाश दीप या वेगवान गोलंदाजांपैकी एकाला बेंचवर बसावे लागू शकते. वेगवान गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह संघात कायम राहू शकतो.

Kuldeep Yadav | Mohammed Siraj
IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

याशिवाय सलामीला कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जैस्वाल खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे, तर मधल्या फळीत शुभमन गिल, विराट कोहली कायम असतील त्यांच्याबरोबर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंत खेळताना दिसेल.

तसेच केएल राहुलला संघात कायम केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्फराजला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये येण्यासाठी प्रतिक्षा करावी लागू शकते. या व्यतिरिक्त भारतीय संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता नाही.

पहिल्या कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/आकाश दीप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.