IND vs BAN 3rd T20I: २९७ धावा, २२ षटकार अन् २५ चौकारची बरसात! टीम इंडियाने T20I मध्ये रचले विक्रमांचे मनोरे

India Record Break T20I Match against Bangladesh in Hyderabad: भारताने बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यांत विक्रमी १३३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने तब्बल २९७ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे या सामन्यात अनेक विक्रम झाले आहेत.
Sanju Samson - Suryakumar Yadav | India vs Bangladesh 3rd T20I
Sanju Samson - Suryakumar Yadav | India vs Bangladesh 3rd T20ISakal
Updated on

India vs Bangladesh: शनिवारी (१२ ऑक्टोबर) भारतीय संघाने हैदराबादमध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने १३३ धावांनी विजय मिळवला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाज २९७ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून संजू सॅमसनने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह १११ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारीही केली.

तसेच रियान परागने १३ चेंडूत ३४ धावांची, तर हार्दिक पांड्याने १८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. भारताकडून प्रत्येक फलंदाजांने आक्रमक खेळ केला. त्यामुळे या डावात भारताकडून तब्बल २२ षटकार आणि २५ चौकार मारण्यात आले. यामुळे भारताने अनेक विक्रम या सामन्यादरम्यान केले आहेत.

भारताने दिलेल्या २९८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ७ बाद १६४ धावाच करता आल्या. बांगलादेशकडून तौहिद हृदोयने ४२ चेंडूत ६३ धावांची नाबाद खेळी केली. तसेच लिटन दासने ४२ धावांची खेळी केली. भारताकडून रवी बिश्नोईने ३ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या.

Sanju Samson - Suryakumar Yadav | India vs Bangladesh 3rd T20I
IND vs BAN: हर्षित राणाला का दिली नाही पदार्पणाची संधी? टॉसनंतर लगेचच BCCI ने सांगितलं खरं कारण

भारताने या सामन्यात केलेले विक्रम

भारताने सॅमसन आणि सूर्यकुमार यांच्या आक्रमणामुळे पहिल्या ६ षटकात १ बाद ८२ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या आपल्याच विक्रमाशी बरोबरी केली.

भारताने स्कॉटलंडविरुद्ध २०२१ मध्ये दुबईत झालेल्या टी२० सामन्यातही पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये २ बाद ८२ धावा केल्या होत्या. तसेच भारताने ४३ चेंडूत १०० धावांचा टप्पा पार केला, त्यामुळे सर्वात जलद संघाच्या १०० धावा करण्याचाही विक्रम झाला.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील कोणत्याही संघाने उभारलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

अव्वल क्रमांकावर नेपाळ असून त्यांनी मंगोलियाविरुद्ध २०२३ मध्ये २० षटकात ३ बाद ३१४ धावा केल्या होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील ही भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारताने २०१७ मध्ये इंदूरला श्रीलंकेविरुद्ध ५ बाद २६० धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या

  • ३१४/३ - नेपाळ विरुद्ध मंगोलिया, २०२३

  • २९७/६ - भारत विरुद्ध बांगलादेश, २०२४

  • २७८/३ - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, २०१९

  • २७८/४ - चेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, २०१९

Sanju Samson - Suryakumar Yadav | India vs Bangladesh 3rd T20I
Sanju Samson Century: 6,6,6,6,6... बूमबूम सॅमसन! फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक! हे रेकॉर्ड झाले ब्रेक

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक बाऊंड्री

  • ४७ - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४

  • ४३ - चेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९

  • ४२ - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, २०२३

  • ४२ - भारत विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे संघ

  • २६ षटकार - नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ २०२३

  • २३ षटकार - जपान विरुद्ध चीन, माँग कॉक २०२४

  • २२ षटकार - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, २०१९

  • २२ षटकार - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०२३

  • २२ षटकार - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४

पुरुषांच्या टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा २०० धावांच टप्पा पार करणारे संघ

  • ३७ वेळा - भारत

  • ३६ वेळा - सोमरसेट

  • ३५ वेळा - चेन्नई सुपर किंग्स

  • ३३ वेळ - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

  • ३१ वेळा - यॉर्कशायर

एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारे संघ

  • २९ विजय - युगांडा (२०२३)

  • २८ विजय - भारत (२०२२)

  • २१ विजय - तान्झानिया (२०२२)

  • २१ विजय - भारत (२०२४)

  • २० विजय - पाकिस्तान (२०२१)

भारताचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय (धावांच्या तुलनेत)

  • १६८ धावा - विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, २०२३

  • १४३ धावा - विरुद्ध आयर्लंड, डब्लिन, २०१८

  • १३३ धावा - विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४

  • १०६ धावा - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२३

Sanju Samson - Suryakumar Yadav | India vs Bangladesh 3rd T20I
IND vs BAN, 3rd T20I: दसऱ्याच्या दिवशी टीम इंडियाची आतषबाजी! सॅमसनचं शतक, तर सूर्याची फिफ्टी अन् विक्रमी २९७ धावांचा डोंगर

भारतासाठी टी२०मध्ये सर्वोच्च भागीदारी

  • नाबाद १९० धावा - रोहित शर्मा - रिंकू सिंग, विरुद्ध अफगाणिस्तान (बंगळुरू, २०२४)

  • १७६ धावा - संजू सॅमसन - दीपक हुड्डा, विरुद्ध आयर्लंड (मालाहाईड, २०२२)

  • १७३ धावा - संजू सॅमसन - सूर्यकुमार यादव, विरुद्ध बांगलादेश (हैदराबाद, २०२४)

  • १६५ धावा - रोहित शर्मा - केएल राहुल, विरुद्ध श्रीलंका, (इंदूर, २०१७)

  • १६५ धावा - यशस्वी जैस्वाल - शुभमन गिल, विरुद्ध वेस्ट इंडिज, (लाऊडरहिल, २०२३)

भारतासाठी टी२०मध्ये सर्वात कमी चेंडूत शतक

  • ३५ चेंडू - रोहित शर्मा (विरुद्ध श्रीलंका, २०१७)

  • ४० चेंडू - संजू सॅमसन (विरुद्ध बांगलादेश, २०२४)

  • ४५ चेंडू - सूर्यकुमार यादव (विरुद्ध श्रीलंका, २०२३)

  • ४६ चेंडू - केएल राहुल (विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६)

  • ४६ चेंडू - अभिषेक शर्मा (विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४)

भारतासाठी सर्वात कमी टी२० सामन्यात ५० विकेट्स

  • ३० सामने - कुलदीप यादव

  • ३३ सामने - अर्शदीप सिंग

  • ३३ सामने - रवी बिश्नोई

  • ३४ सामने - युझवेंद्र चहल

  • ४१ सामने - जसप्रीत बुमराह

सर्वात कमी वयात भारतासाठी टी२० सामन्यात ५० विकेट्स

  • २४ वर्षे ३७ दिवस - रवी बिश्नोई

  • २४ वर्षे १९६ दिवस - अर्शदीप सिंग

  • २५ वर्षे ८० दिवस - जसप्रीत बुमराह

  • २८ वर्षे २३७ दिवस - कुलदीप यादव

  • २८ वर्षे २९५ दिवस - जसप्रीत बुमराह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.