IND vs ZIM: कर्णधार शुभमन गिलचं खणखणीत अर्धशतक; ऋतुराजची फटकेबाजी; भारताचं झिम्बाब्वेसमोर 183 धावांचं लक्ष्य

India vs Zimbabwe, 3rd T20I: झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यांत भारताकडून कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक केले आहे. मात्र ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक एका धावेनं हुकलं.
Shubman Gill | Team India
Shubman Gill | Team IndiaX/BCCI
Updated on

India vs Zimbabwe, 3rd T20I: झिम्बाव्वे विरुद्ध भारत यांच्यात बुधवारी टी२० मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हरारे येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १८२ धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य असणार आहे.

भारताकडून कर्णधार शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली आहे. ऋतुराज गायकवाडनेही चांगली फटकेबाजी केली.

Shubman Gill | Team India
IND vs ZIM: शतक करण्यासाठी अभिषेकला लकी ठरली शुभमन गिलची बॅट, सामन्यानंतर उलगडलं मोठं रहस्य

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला जवळपास १० च्या धावगतीने धावा जमवल्या होत्या. मात्र ६७ धावांच्या भागीदारीनंतर ९ व्या षटकात जयस्वाल २७ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्माही १० धावांवर स्वस्तात बाद झाला. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला या सामन्यात सूर सापडलेला दिसला.

Shubman Gill | Team India
IND vs ZIM 3rd T20I: टीम इंडियात मोठे बदल; जयस्वाल, दुबे अन् सॅमसनचे प्लेइंग-11 मध्ये पुनरागमन; 'या' खेळाडूंचा पत्ता कट

त्याने ऋतुराज गायकवाडला साथीला घेतले. या दोघांनीही आक्रमक खेळ करत ७२ धावांची भागादारी केली. गिलने यादरम्यान त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. अखेर त्यांची जोडी ब्लेसिंग मुझराबनीने तोडली. त्याने गिलला ४९ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. यामध्ये ७ चौकार आणि ३ षटकार मारले.

त्यानंतर ऋतुराजने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानेही फटकेबाजी केली पण त्याला अर्धशतकासाठी एक धावेची गरज असताना तो बाद झाला. त्याने २८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावांची खेळी केली. अखेरीस संजू सॅमसन १२ धावांवर नाबाद राहिला.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.