India T20I Squad for Sri Lanka tour: श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर टीम इंडियाची घोषणा झाली. हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) पत्ता कट करून ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या ( Surya Kumar Yadav) खांद्यावर सोपवण्यात आले. यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाल्याचे संकेत दिले आहेत.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर आणि कर्णधार रोहित शर्माने आंरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. उप कर्णधार हार्दिकचे प्रमोशन होईल अशी चर्चा सुरू होती. पण, सूर्यकुमार यादवचे नाव पुढे आले आणि श्रीलंका दौऱ्यावर कर्णधारपदाची माळ सूर्याच्या गळ्यात पडली. खराब फिटनेस रेकॉर्डमुळे हार्दिकच्या नेतृत्वावर दीर्घकाळ प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होईल.
गौतम गंभीरने श्रीलंका दौऱ्यावरील वन डे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर्सना खेळण्याची विनंती केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी भारताच्या वाट्याला फार कमी वन डे सामने येत असल्याने रोहित, विराट व जस्सीने हे सर्व वन डे सामने खेळावे अशी गंभीरची इच्छा होती. रोहित व विराट यांनी ती मान्य करून श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळणार असल्याचे कळवले.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.
भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.