IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

India Squad for T20 Series against Bangladesh: बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात वेगवान गोलंदाज मयंक यादवलाही संधी देण्यात आली आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India vs Bangladesh T20I Series: बांगालदेश संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या बांगलादेश संघ भारताविरुद्ध कसोट मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर आता भारत आणि बांगलादेश संघात ६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा झाली आहे.

भारतीय टी२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तसेच या संघात हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. याशिवाय काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. आयपीएल २०२४ मध्ये ताशी १५० किमी वेगाने सातत्याने गोलंदाजी करत लक्ष वेधलेल्या मयंक यादवला संधी देण्यात आली. त्याला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

Team India
IND vs BAN, 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द! पावसाने खेळाडूंना मैदानात उतरूच दिलं नाही

याबरोबरच अभिषेक शर्मा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, जितेश शर्मा, रियान पराग या युवा खेळाडूंनाही भारताच्या संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, शिवम दुबे असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनबरोबर जितेश शर्मा हा विदर्भाकडून खेळणाऱ्या खेळाडूचाही पर्याय असणार आहे.

Team India
IND vs BAN, Video: ऋषभ पंतचा सल्ला ऐकला अन् अश्विनला बांगलादेशी कर्णधाराची मिळाली विकेट, पाहा कशी खेळली चाल

दरम्यान, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह अशा खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर इराणी कप खेळत असल्याने ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनचा विचार करण्यात आला नसण्याची शक्यता दाट आहे. ऋतुराज इराणी कप स्पर्धेसाठी शेष भारतीय संघाचा कर्णधार आहे.

असा आहे भारतीय संघ -

सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव

भारत विरुद्ध बांगलादेश टी२० मालिकेचे वेळापत्रक

  • ६ ऑक्टोबर - पहिला टी२० सामना, ग्वाल्हेर (संध्या. ७ वा.)

  • ९ ऑक्टोबर - दुसरा टी२० सामना, दिल्ली (संध्या. ७ वा.)

  • १२ ऑक्टोबर - तिसरा टी२० सामना, हैदराबाद (संध्या. ७ वा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.