Indian Squad for SL Tour: गौतम गंभीरने स्पष्ट सांगितले, मला अशा व्यक्तीसोबत काम करायचे नाही, ज्याचा...

India Squad for Sri Lanka Tour: गौतम गंभीरला संघात त्याला हवा तोच कर्णधार आणि खेळाडू हवे आहेत, पण...
Gautam Gambhir Hardik Pandya vs Suryakumar Yadav
Gautam Gambhir Hardik Pandya vs Suryakumar Yadavsakal
Updated on

India Squad for Sri Lanka Tour : गौतम गंभीर ( Gautam Gambhir) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून संघात स्थित्यंतराचा काळ सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. त्याची प्रचिती आता त्याच्या मार्गदर्शनाखालील पहिल्या दौऱ्यावर येतेय... भारतीय संघ येत्या ४-५ दिवसांत श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे. पण, या संघात कोणाची निवड करावी, कोणाला कर्णधार करावे यावरून सध्या घमासान सुरू असल्याचे दिसतेय. गौतम गंभीरने ( Hed Coach of Team India ) ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच संघ निवडीसाठी सर्वाधिकार हवेत, हे स्पष्ट केले होते. त्या अटीवरच तो सध्या अडून बसला आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठीची संघ निवड खरं तर दोन दिवसांपूर्वीच होणे अपेक्षित होते. मंगळवार आणि बुधवार अशा दोन बैठका गौतम गंभीर, निवड समिती आणि जय शाहा यांच्यात पार पडल्या. पण, त्यात ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार कोण, यावरून वाद झाल्याचे कळतेय. रोहित शर्माने वन डे मालिकेत खेळण्यास तयारी दर्शवल्याने तिथे कर्णधारपदाचा प्रश्न सुटला आहे. पण, ट्वेंटी-२० मालिकेसाठी गौतमला दीर्घकाळ टीकणारा कर्णधार हवा आहे.

Gautam Gambhir Hardik Pandya vs Suryakumar Yadav
India Squad for Sri Lanka : उत्सुकता शिगेला! भारतीय संघाची निवड होणार आज; कोणकोणत्या युवा खेळाडूंना मिळणार संधी?

रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०च्या निवृत्तीनंतर ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्या आघाडीवर आहे. पण, त्याची दुखापत ही गौतमच्या चिंतेत भर पडत आहे. हार्दिक दुखापतीमुळे सातत्याने क्रिकेट खेळू शकलेला नाही. पण, वन डे वर्ल्ड कपमधील दुखापतीतून सावरून तो मागील ३-४ महिन्यात नॉन स्टॉप क्रिकेट खेळला आहे. तरीही २०२६च्या वर्ल्ड कपचा विचार करता गौतमला कर्णधारपदासाठी सक्षम पर्याय हवाय आणि त्यासाठी सूर्यकुमार यादवचे ( Surya Kumar Yadav) चे नाव चर्चेत आले आहे. या नावाला निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांचीही पसंती आहे.

गौतमने ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी सूर्याचे नाव थेट सुचवले नसले तरी वर्कलोड मॅनेज करेल, असा कॅप्टन त्याला हवाय. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले,“जरी गंभीरने थेट सूर्याचे नाव सूचवले नसले, तरी त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याला अशा कर्णधारासोबत काम करायचे आहे, ज्याचा कामाचा ताण या प्रवासात अडथळा ठरणार नाही.”

Gautam Gambhir Hardik Pandya vs Suryakumar Yadav
India Squad for Sri Lanka Tour: वातावरण तापलं! कर्णधार कोण? 'त्या' दोघांवरून गौतम गंभीर अन् जय शाह यांच्यामध्ये मतभेद

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे अनेकदा संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे गौतमच्या बोलण्यातून त्याचा हार्दिकला विरोध असल्याचे समजतेय. त्याचवेळी बीसीसीआय गौतमच्या भूमिकेवर फारसे खूश नाहीत. काही सदस्यांनी हार्दिकच्या नावाचा आग्रह धरला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचा अनुभव संघाच्या कामी येईल, असे त्यांचे मत आहे. त्याची कामगिरीही चांगली झाली होती.

तेच सूर्यकुमारचा विचार केल्यास त्याने ७ ट्वेंटी-२० सामन्यांतच भारताचे नेतृत्व सांभाळले आहे. शिवाय तोही पस्तीशीजवळ आलेला आहे आणि अशात त्याला कर्णधार करणे योग्य ठरेल, का हा प्रश्न काहींना सतावतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.