India squad for SL Tour : रोहित शर्माने पडद्यामागून हार्दिक पांड्याचा गेम केला? गौतम गंभीरसोबत मिळून मोठा डाव टाकला

India Squad for Sri Lanka Tour : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिकचा कर्णधाराचा मार्ग मोकळा असे वाटले होते, पण...
Rohit Sharma suggest Suryakumar Yadav name for T20I captain
Rohit Sharma suggest Suryakumar Yadav name for T20I captainsakal
Updated on

India Squad for Sri Lanka Tour : श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधाराचा पेच दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होताना दिसतोय. या दौऱ्यासाठी संघ निवडीसाठी दोन दिवस बैठक होऊनही अंतिम निर्णय समोर आलेला नाही. आज मुख्य प्रशिक्षक गौतम गभीर, BCCI सचिव जय शाह आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर व त्यांची टीम संघ जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हे नाव आघाडीवर होते. पण, मुंबईच्या सूर्यकुमार यादवची ( Surya Kumar Yadav) एन्ट्री झाली अन् गुंता वाढला.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर आणि कर्णधार रोहित शर्माने आंरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. उप कर्णधार हार्दिकचे आता प्रमोशन होईल अशी चर्चा सुरू असताना आगामी श्रीलंका दौऱ्यावर या शर्यतीत सूर्यकुमारचे नाव पुढे आले. खराब फिटनेस रेकॉर्डमुळे हार्दिकच्या नेतृत्वावर दीर्घकाळ प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित या दोघांनाही सूर्यकुमारला कर्णधार बनवायचे आहे. रोहितनेच सूर्याचे नाव सुचवल्याची चर्चा आहे. गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पंड्याला या निर्णयाची आधीच माहिती दिली आहे.

Rohit Sharma suggest Suryakumar Yadav name for T20I captain
Indian Squad for SL Tour: गौतम गंभीरने स्पष्ट सांगितले, मला अशा व्यक्तीसोबत काम करायचे नाही, ज्याचा...

२७ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार हा २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत भारतीय कर्णधार असेल अशी शक्यता अधिक आहे. सूर्यकुमारचा ट्वेंटी-२० रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पण केल्यानंतर त्याने ६८ सामन्यांत ४३.३३ च्या सरासरीने २३४० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४ शतकंही आहेत. सूर्याने आयपीएलमध्ये १५० सामन्यांत ३५९४ धावा केल्या आहेत.

Rohit sharma Surya Kumar Yadav
Rohit Sharma Surya kumar Yadavsakal

२०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकने या फ्रँचायझीसाठी १०६ सामन्यांत १६९२ धावा केल्या आहेत. त्याने गुजरात टायटन्ससाठी ३१ सामन्यांत ८३३ धावा केल्या आहेत आणि संघाला जेतेपदही जिंकून दिले आहे. गोलंदाजीत पांड्याने १३७ सामन्यांत ६४ बळी घेतले. कर्णधार म्हणून पांड्याने ४५ पैकी २६ सामने जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.