BCCIच्या बैठकीत खडाजंगी! Hardik Pandyaला हटवण्यापूर्वी फिरवले अनेक फोन, खेळाडूंना विचारलं अन्...

Suryakumar Yadav And Hardik Pandya : 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या तीन टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० संघाची कमान सांभाळतील. आता संघ निवड बैठकीशी संबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत.
Suryakumar Yadav And Hardik Pandya
Suryakumar Yadav And Hardik Pandyasakal
Updated on

Suryakumar Yadav to lead India in T20Is against Sri Lanka : रोहित शर्माच्या टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे नवे पर्व सुरू झाले आहे. श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत चाहत्यांना आता एक नवी टीम इंडिया मैदानावर पाहायला मिळणार आहे. या संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे असेल, तर शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

पण एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपकर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला दोन्ही फॉरमॅटमधील नेतृत्वाच्या भूमिकेतून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. या टीम निवडमध्ये भारताचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांची छाप संपूर्ण संघावर दिसून येत आहे, परंतु हे धाडसी निर्णय घेणे गंभीरसाठी इतके सोपे नव्हते.

Suryakumar Yadav And Hardik Pandya
Hardik Pandya : पांड्यावर अन्याय... गंभीरने हार्दिकला का दिला नाही पाठिंबा? अहवालात मोठा खुलासा

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा करण्याआधी निवड बैठक दोन दिवस चालली. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या बैठकीत मतभेद आणि जोरदार वादविवादही पाहायला मिळाले. बैठकीतच अनेक खेळाडूंना फोन करून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.

हार्दिकच्या जागी कर्णधार म्हणून सूर्याची आणि एकदिवसीय मालिकेत राहुलच्या जागी गिलची उपकर्णधारपदी निवड हे भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

Suryakumar Yadav And Hardik Pandya
India Squad vs Sri Lanka : गौतम गंभीरकडून MS Dhoniचे शिलेदार दुर्लक्षित! फॉर्म असूनही संघात नाही स्थान

टीम इंडियाच्या खेळाडूंचा पंड्यापेक्षा सूर्यावर जास्त विश्वास

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, टी-20 संघांचा उपकर्णधार हार्दिक पांड्या होता तर त्याला कर्णधार न बनवणे हे अन्यायकारक ठरेल. विशेषत: जेव्हा त्याने वर्ल्ड कपदरम्यान अप्रतिम कामगिरी केली आहे. पण खेळाडूंच्या विश्वासामुळे, पारड सूर्यकुमार यादवच्या बाजूने झुकलं.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआयला मिळालेला 'फीडबॅक' असा होता की खेळाडू पांड्यापेक्षा यादववर अधिक विश्वास ठेवतात आणि त्यांच्या हाताखाली काम करण्यास सोयीस्कर होते.

या बैठकीत असा युक्तिवाद करण्यात आला की, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला पुढील दोन वर्षांसाठी संघ तयार करण्याची संधी नाही, त्यामुळे पुढील टी-20 आंतरराष्ट्रीय सायकलसाठी रोडमॅप तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा उपकर्णधार असलेल्या पांड्याला त्याच्या निर्णयाबाबत मुख्य निवडकर्ता आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनी आधीच कळवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.