India Squad for Sri Lanka Series : रोहित-विराटच्या जागी कोण असणार ओपनर? श्रीलंका दौऱ्यासाठी आज होणार संघांची घोषणा

या दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा व्हायची आहे.
India Squad for Sri Lanka Series
India Squad for Sri Lanka Seriessakal
Updated on

India Squad for Sri Lanka Series : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत झिम्बाब्वेचा 4-1 ने पराभव केला. आता भारतीय संघाचे पुढील मिशन श्रीलंका दौरा आहे.

या दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा व्हायची आहे. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचाही हा पहिला दौरा असेल.

India Squad for Sri Lanka Series
Mumbai Cricket: स्टार क्रिकेटरने सोडली मुंबईची साथ, 2024-25 हंगामात खेळणार 'या' संघाकडून?

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दौऱ्यावर जाणार नाहीत यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेतलेली आहे. अशा स्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले जाऊ शकते. तर वनडेची कमान केएल राहुलकडे दिली जाऊ शकते.

पण या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भारताची नवी सलामी जोडी शोधणे. खरंतर, व्यवस्थापनाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एक मोठा प्रयोग केला होता. संपूर्ण स्पर्धेत रोहितसह कोहलीला सलामीला पाठवण्यात आले. या दोघांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर दोन नव्या सलामीच्या जोडीचा प्रयत्न करण्यात आला.

India Squad for Sri Lanka Series
Harbhajan Singh: युवराज, हरभजन, सुरेश रैना यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल! जाणून घ्या प्रकरण

झिम्बाब्वे दौऱ्यावर अभिषेक शर्माने शुभमन गिलसोबत पहिले 2 टी-20 सामने खेळले. अभिषेकने दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते. मात्र, मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांमध्ये गिलसह यशस्वी जैस्वालला सलामीला पाठवण्यात आले. येथे यशस्वीने चमकदार कामगिरी केली. त्याने तीनही सामन्यात 36, नाबाद 93 आणि 12 धावा केल्या.

पण आता शुबमन गिलला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघात स्थान मिळणार नसल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत अभिषेक शर्मासह यशस्वी जैस्वालला सलामीसाठी पाठवू शकतात.

याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन हे देखील टी-20 मध्ये सलामीचे प्रबळ दावेदार आहेत. तर गिल वनडेत प्रबळ दावेदार असेल. तर अभिषेक बाहेर जाऊ शकतो. अशा स्थितीत यशस्वीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत गिलसोबत पाठवले जाऊ शकते. याशिवाय केएल राहुललाही एकदिवसीय सामन्यात सलामीला उतरवले जाऊ शकते.

India Squad for Sri Lanka Series
Video: स्वागत नहीं करोगे हमारा! वर्ल्ड कप विजेत्या Hardik Pandya साठी उसळली तौबा गर्दी

भारताचा संभाव्य टी-20 संघ (India potential T20 squad Sri Lanka Series) :

हार्दिक पंड्या (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.

भारताचा संभाव्य वनडे संघ (India potential ODI squad Sri Lanka Series) : केएल राहुल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.

भारत-श्रीलंका वेळापत्रक

27 जुलै- पहिला टी-20, पल्लेकेले

28 जुलै- दुसरी टी-20, पल्लेकेले

30 जुलै- तिसरा टी-20, पल्लेकेले

2 ऑगस्ट- पहिला वनडे, कोलंबो

4 ऑगस्ट- दुसरा वनडे, कोलंबो

7 ऑगस्ट- तिसरा वनडे, कोलंबो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.