Champions Trophy 2025 : श्रीलंका चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाला रिप्लेस करणार, पाकिस्तानात जाणार?

Champions Trophy 2025 : पुढील वर्षात पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे.
India to be replaced by Sri Lanka in Champions Trophy 2025
India to be replaced by Sri Lanka in Champions Trophy 2025 Sakal
Updated on

India unlikely to travel to Pakistan - भारत-पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय परिस्थितीमुळे उभय देघांमध्ये क्रिकेट मालिका मागील १२ वर्षांत झालेली नाही. IND vs PAK सामना चाहत्यांना फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये व आशिया चषक स्पर्धेत पाहायला मिळतो. नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले होते. आता पाकिस्तानचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी ते चॅम्पियन्स ट्रॉफीची ( Champions Trophy 2025 ) ते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, त्यांचा हा उत्साह मावळण्याची शक्यता आहे..

भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभाग घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे BCCI ने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने ICC कडे चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिराती अशा दोन देशांचा टीम इंडियाच्या सामने खेळवण्यासाठी पर्याय दिल्याचे समजतेय. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा याला विरोध आहे आणि त्यांनी भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अशा परिस्थितीत आयसीसीने PCB चे ऐकल्यास टीम इंडिया या स्पर्धेतून माघार घेऊ शकते.

India to be replaced by Sri Lanka in Champions Trophy 2025
Video: 21 वर्ष, 188 कसोटी अन् 704 विकेट्स! James Anderson ची निवृत्ती, इंग्लंडकडून विजयाची भेट

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे आणि भारतीय संघ स्पर्धेत न खेळल्यास श्रीलंका त्यांना रिप्लेस करेल. हाती आलेल्या वृत्तानुसार २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतत ९व्या क्रमांकावर राहिलेला श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाला रिप्लेस करेल. या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जायचे की नाही, याचा सर्वस्वी निर्णय हा भारत सरकार घेईल, हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

India to be replaced by Sri Lanka in Champions Trophy 2025
Gautam Gambhir: 'फॉर्ममध्ये असाल, तर तिन्ही फॉरमॅट खेळा', गंभीरचा सिनियर्स खेळाडूंना इशारा

२०२३च्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते, परंतु BCCI च्या विरोधामुळे ती हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली गेली. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.