IND vs SL: नव्या पर्वाला होणार सुरूवात! भारत-श्रीलंका टी२० मालिका कधी अन् कुठे पाहाणार, जाणून घ्या

India Tour of Sri Lanka Live Streaming: भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील टी२० मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सामने कुठे आणि कधी पाहाणार, जाणून घ्या.
India vs Sri Lanka T20 Series
India vs Sri Lanka T20 SeriesSakal
Updated on

Sri Lanka vs India Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दौऱ्यात भारतीय संघाला ३ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. टी२० मालिकेला २७ जुलै रोजी सुरुवात होणार आहे.

दरम्यान, ही मालिका अनेक गोष्टींमुळे खास आहे. या मालिकेपासून सुर्यकुमार यादव भारताच्या टी२० संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच गौतम गंभीरचीही ही मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका आहे. त्यामुळे ही भारतीय क्रिकेटमधील नव्या पर्वाची सुरुवातही मानली जात आहे.

टी२० मालिकेनंतर २ ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. वनडे मालिकेचे नेतृत्व रोहत शर्माकडेच कायम करण्यात आले आहे. तसेच या मालिकेत विराट कोहलीही खेळणार आहे. याशिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाले आहे.

त्याचबरोबर शुभमन गिलसाठीही उपकर्णधार म्हणून हा पहिलाच परदेशी दौरा आहे. त्याला भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

India vs Sri Lanka T20 Series
IND vs SL : जो बोलते है ना...! Suryakumar Yadav कोच गौतम गंभीरसोबतच्या नात्यावर व्यक्त झाला Video

इतकंच नाही, तर श्रीलंकेनेही कर्णधार बदलला आहे. भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी वनिंदू हसरंगाने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यामुळे चरिथ असलंकाकडे नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली आहे.

नुवान तुषारा आणि दुश्मंथा चमिरा दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे दिलशान मदुशंका आणि असिथा फर्नांडो यांना संघात संधी देण्यात आली आहे.

श्रीलंकाने अद्याप वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केलेली नाही.

आमने-सामने आकडेवारी

भारत आणि श्रीलंका हे संघ आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २९ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील १९ वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर ९ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

लाईव्ह प्रक्षेपण कुठे होणार?

भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर सोनी स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहाता येणार आहेत. तसेच Sony Liv या या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

India vs Sri Lanka T20 Series
IND vs SL : हार्दिकची संघातील भूमिका काय? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितले, रोहितबाबत म्हणाला...

श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक -

टी-२० मालिका (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामने सुरू होतील)

  • पहिला सामना - २७ जुलै, पाल्लेकेले

  • दुसरा सामना - २८ जुलै, पाल्लेकेले

  • तिसरा सामना - ३० जुलै, पाल्लेकेले

वनडे मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामने सुरू होतील.)

  • पहिला सामना - २ ऑगस्ट, कोलंबो

  • दुसरा सामना - ४ ऑगस्ट, कोलंबो

  • तिसरा सामना - ७ ऑगस्ट, कोलंबो

भारत - श्रीलंका संघ -

भारता वनडे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

भारताचा टी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेचा टी-२० संघ : पाथम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), चारिथ असलंका(कर्णधार), दसुन शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो, दिनेश चंडीमल, कुशल परेरा, असिथा फर्नांडो, दुनिथ वेलालागे, चामिंडू विक्रमसिंघे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.