हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर U19 World Cup विजेत्या भारतीय कर्णधाराचं क्रिकेटमध्ये पुनरागमन!

Yash Dhull Comeback After Heart Surgery: भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराच्या हृदयावर या वर्षाच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आता त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात यश मिळवले आहे.
Yash Dhull
Yash DhullSakal
Updated on

साल २०२२ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार यश धूल याची काही महिन्यांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याने आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमनही केले आहे. सध्या सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेतून तो क्रिकेटमध्ये परतला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला यशवर ही शस्त्रक्रिया झाली. खरंतर बीसीसीआयने निवडलेल्या उदयोन्मुख खेळाडूंच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (NCA) ट्रेनिंग कॅम्पदरम्यान दैनंदिन तपासणीवेळी त्याच्या आजाराबाबत माहिती मिळाली.

त्याच्या हृदयाला जन्मजातच होल होते. त्यानंतर एनसीएमधील मेडिकल टीमने त्याला त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याच्यावर दिल्लीमध्ये शस्त्रक्रिया झाली. न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने त्याच्या उपचाराची काळजी घेतली होती.

Yash Dhull
T20 क्रिकेट गाजवलेल्या स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; निवृत्तीची घोषणा करत दिला धक्का
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()