पाकिस्तानी खेळाडूचं डोकं फिरलंय! भारतीय गोलंदाजांवर Ball Tampering चा आरोप केला, इंग्लंडविरुद्धच्या विजयामुळे शेजाऱ्यांना पोटदुखी

Pakistan pacer alleges Vaseline use by Indian bowlers : भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना ओव्हलवर भारताने शानदार विजयाने संपवला. मात्र, या ऐतिहासिक विजयावर आता वादाचा गालबोट लागला आहे.
Mohammed Siraj
Mohammed Siraj
Updated on: 
Summary
  • भारताने इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी ६ धावांनी जिंकत मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.

  • मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या घातक माऱ्यामुळे इंग्लंडचा शेवटचा डाव कोसळला.

  • पाकिस्तानच्या माजी खेळाडू शब्बीर अहमद खानने टीम इंडियावर व्हॅसलीन वापरून बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोप केला

Former Pakistan fast bowler Shabbir Ahmed Khan has stirred a controversy : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि ही कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी घातक गोलंदाजी केली. इंग्लंडच्या फलंदाजीची फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि भारताला ६ धावांनी विजय मिळवून दिला. पण, कसोटी मालिका संपल्यानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने वादग्रस्त विधान केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com