IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया हुकूमी पत्ता टाकणार; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियाची गोची करणार

Border-Gavaskar Trophy 2024-25 - भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे.
Nitish kumar reddy
Nitish kumar reddyesakal
Updated on

India vs Australia Nitish Kumar Reddy : टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद ( WTC) स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. मागील दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांवर टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि विजयी हॅटट्रिक करण्याचं भारताचं टार्गेट आहे. त्यामुळेच भारतीय संघ यजमानांना आव्हान देण्यासाठी जोर लावणार हे स्पष्ट आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा BCCI कडून होणार आहे. या संघात एक युवा खेळाडूचे नाव दिसू शकते अशी शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.