IND vs BAN 1st Test : Rishabh Pant च्या दमदार खेळीला 'ब्रेक' अन् यशस्वी जैस्वालची फिफ्टी; दोघांचं होतंय कौतुक...

India vs Bangladesh 1st Test Live : हसन महमूदने भारताला पहिल्या दिवशी चार धक्के दिले. दिवसाच्या पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेतल्यानंतर हसनने लंच ब्रेकनंतर चौथी विकेटही घेतली.
IND vs BAN
IND vs BANesakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test Live updates in Marathi : भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) आणि ऋषभ पंत यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. ३० डिसेंबर २०२२ मध्ये जीवघेण्या अपघातातून सावरून ऋषभने ६३४ दिवसांनी आंतरराष्ट्रीय कसोटीत पुनरागमन करताना दम दाखवला. त्याचे अर्धशतक हुकले असले तरी त्याच्या जीगरबाज खेळीचे कौतुक होत आहे. त्याचवेळी यशस्वीने अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेशच्या हसन महमूदने चार विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.