Kanpur Test वर आणखी एक संकट! IND vs BAN दुसरी कसोटी न होण्याची शक्यता बळावली; वाचा नेमकं काय घडलं

IND vs BAN 2nd Test : पहिली कसोटी जिंकून भारतीय संघ कानपूर येथे दाखल झाला आहे. बांगलादेशचाही संघ दुसऱ्या कसोटीत पलटवार करण्यासाठी तयारीला लागला आहे.
India vs Bangladesh 2nd Test
India vs Bangladesh 2nd Test esakal
Updated on

India vs Bangladesh 2nd Test : भारत-बांगलादेश यांच्यात कानपूर येथे होणाऱ्या कसोटीला हिंदू संघटनांचा विरोध होताना दिसतोय. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेध म्हणून बांगलादेश मालिकेला विरोध आहे. त्यामुळे कानपूर कसोटीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यात आणखी एक संकट कसोटीवर ओढावलं आहे आणि त्यामुळे ही कसोटी होईल की नाही, अशी भीती व्यक्त होताना दिसतेय.

चेन्नई कसोटीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ कानपूर येथे दाखल झाला. येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरी कसोटी होणार आहे. २७ सप्टेबंरपासून सुरू होणाऱ्या कसोटीवर पावसाचे सावट आहे. कानपूर स्टेडियमची ड्रेनेज प्रणालीही चांगली नाही, त्यामुळे पाऊस पडल्यास खेळपट्टी सुकवण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची जाऊ शकतो. AccuWeather नुसार कानपूर कसोटीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ९० टक्के आहे आणि दुसऱ्या दिवशीही पाऊस पडेल असा अंदाज ८० टक्के आहे. तिसऱ्या दिवशीही पावसाचा अंदाज असल्याने कसोटीचे पहिले तीन दिवस वाया जातील, असे सांगण्यात येत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्यादृष्टीने ही कसोटी रद्द होणे भारताला परवडणारे नाही.

kanpur test
kanpur testesakal

भारतीय संघात कोणताच बदल नाही

दुसऱ्या कसोटीसाठी BCCI ने जाहीर केलेल्या संघात कोणताच बदल केलेला नाही. जसप्रीत बुमराहला या कसोटीसाठी विश्रांती दिली जाईल अशी शक्यता होती. कानपूरची खेळपट्टी पाहता भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरू शकतो. फिरकीपटूच्या तिसऱ्या जागेसाठी कुलदीप यादव व अक्षर पटेल यांच्यात स्पर्धा असेल.

India vs Bangladesh 2nd Test
Virat Kohli Ranji Trophy : विराट कोहलीची रणजी संघासाठी संभाव्य खेळाडूंमध्ये निवड, २०१९ नंतर प्रथमच देशांतर्गत क्रिकेट खेळणार?

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.