Viral video: आता 'थाला फॉर रिजन' नाही तर 'अण्णा फॉर रिजन'; अश्विनची सहकाऱ्यांकडून मस्करी

IND vs BAN second test: बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कानपूर येथे पोहोचला आहे.
Indian players
Indian playersesakal
Updated on

Indian cricketers funny moment: बांगलादेशविरुद्ध पहिल्या विजयाने भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कानपूर येथे रवाना झाला आहे. चेन्नई ते कानपूर प्रवासादरम्यान भारतीय खेळाडूंसोबत एक विनोदी किस्सा घडला.हा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संपूर्ण व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू एकमेकांची मस्करी करताना पहायला मिळाले. त्यात एक प्रसंग असा आहे की, प्रवासादरम्यान विमानामध्ये पहिल्या सामन्यातील सामनावीर आर अश्विनच्या बाजूला जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा बसले आहेत. महेंद्रसिंग धोनीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'थाला फॉर रिजन' या वाक्यावरून बुमराह व जडेजा अश्विनला 'अण्णा फॉर रिजन' म्हणत आहेत.

अश्विनने व्हिडीओ मध्ये सांगितले की, "हे दोघे मला चिडवत आहेत." त्यावर प्रत्युत्तर देत बुमराह म्हणाला की आम्ही चिडवत नसून त्याच्या कामगिरीचे कौतुक करत आहोत.

पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात अश्विनने संघ संकटात असताना १३३ चेंडूत ११३ धावा केल्या होत्या. अश्विन-जडेजा जोडीने या डावात १९९ धावांची मोठी भागीदारी केली. दुसऱ्या डावात आश्विनने एकूण ६ विकेट्स घेतल्या व कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ५२२ विकेट्स पूर्ण केल्या.

अश्विनसोबतच रवींद्र जडेजाने देखील या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. जडेजाने भारताच्या पहिल्या डावात १२४ चेंडूत ८६ धावा जोडल्या. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३७६ धावसंख्या उभी केली. धमाकेदार फलंदाजी सोबतच रवींद्र जडेजाने संपूर्ण सामन्यात बांगलादेशच्या एकूण ५ विकेट्स घेतल्या. तर बुमराहलाही ५ विकेट्स घेण्यात यश आले.

Indian players
Rishabh Pant चा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका; कसोटी मालिकेत रोखण्यासाठी आखणार नवी रणनीती

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत(यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.