India vs England 4th Test Umpires Call Controversy : मैदानात अंपायर कॉलवरून आजकाल पुन्हा बरेच वाद होत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान अंपायर कॉल वादाचे कारण बनला आहे. अलीकडेच, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अंपायर कॉल बंद करण्याची मागणी केली होती. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात अंपायर कॉल नियमामुळे आमच्या फलंदाजाला चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आले आहे, हा काय नियम आहे हे मला समजू नाही, असे कर्णधार म्हणाला होता.
यानंतर रांची कसोटी सामन्यात पहिल्या डावात अंपायर कॉलमुळे भारतीय संघाने 4 विकेट गमावल्या. अशा स्थितीत अंपायर कॉलमुळे एवढा वाद अनेकदा होत असेल तर नियम बदलले का जात नाही, हा मोठा प्रश्न आहे.
अंपायर कॉलवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अंपायर कॉलने अनेकवेळा हेडलाइन्स बनल्या आहेत आणि तेव्हाही हा नियम बंद करण्याची मागणी झाली आहे. असे असूनही आयसीसीकडून या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अशा स्थितीत तुमच्या मनातही प्रश्न असू शकतो की, अनेक क्रिकेटपटू आणि अनेक चाहते या नियामाच्या विरोधात असतानाही हा नियम का बदला जात नाही. या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्याआधी तुम्हाला थर्ड अंपायर कोणत्या परिस्थितीत अंपायर कॉल देतो याची माहिती पाहिजे.
अंपायर कॉल म्हणजे काय?
डीआरएस लागू झाल्यापासून अंपायर कॉल हा क्रिकेटविश्वात चर्चेचा प्रमुख मुद्दा बनला आहे. जेव्हा चेंडू बॅट्समनच्या पॅडवर लागतो, तेव्हा मैदानावरील अंपायर खेळाडूला आउट किंवा नॉट आऊट देतात. या परिस्थितीत गोलंदाज किंवा फलंदाजाने रिव्ह्यूची मागणी केल्यास, प्रकरण तिसऱ्या अंपायलकडे जाते. त्यानंतर बॉल ट्रॅकिंगच्या मदतीने तिसरा अंपायर चेंडू पाहतो. ज्यामध्ये महत्त्वाचे इम्पॅक्ट, पिचिंग आणि स्टंम्प आहे.
नियम का बदलले जात नाहीत?
बॉल ट्रॅकिंगमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, जर चेंडू पूर्णपणे विकेटला लागत असले तर त्याचा अर्थ असा होतो की चेंडू विकेटला लागण्याची शक्यता ही शंभर टक्के आहे. अशा परिस्थितीत तिसरा अंपायर मैदानावरील पंचांनी जर फलंदाजाला बाद ठरवलं असेल तर तो निर्णय काम ठेवतो.
दुसरीकडे, बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडूचा अर्धा भाग हा स्टंम्पला लागत असेल तर स्क्रीनवर अंपायर्स कॉल असं लिहिलेलं आपण पाहतो. ज्यावेळी चेंडूचा अर्धा भाग हा स्टंम्पवर आणि अर्धा भाग बाहेर असतो असं डीआरएसमध्ये दिसतं त्यावेळी चेंडू नक्की स्टंम्पला लागणार की नाही याबाबत शाश्वती नसते. त्यावेळी तंत्रज्ञानातील मार्जिन ऑफ एरर लक्षात घेत हा निर्णय मनुष्यावर म्हणजे अंपायरवर सोडला जातो. म्हणूनच DRS मध्ये अंपायर्स कॉलची एक सोय किंवा पळवाट ठेवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.