Ind Vs Eng : KL राहुलच्या पुनरागमनामुळे कोणत्या खेळाडूचा पत्ता कट? प्लेइंग-11 मध्ये होणार मोठे बदल

India vs England 4th Test KL Rahul Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे.
India vs England 4th Test KL Rahul Playing 11 Marathi News
India vs England 4th Test KL Rahul Playing 11 Marathi Newssakal
Updated on

India vs England 4th Test Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल या सामन्यात पुनरागमन करू शकतो. त्यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होणार आहेत. त्याचबरोबर केएल राहुलचे प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यानंतर एका खेळाडूला वगळले जाणार हे निश्चित मानले जात आहे.

खरं तर, मालिकेतील पहिल्याच सामन्यात केएल राहुलला दुखापत झाली होती. त्यानंतर राहुलला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावे लागले. केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. पण आता वृत्तानुसार, केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि चौथ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

India vs England 4th Test KL Rahul Playing 11 Marathi News
BCCI Action Manoj Tiwary : रणजी ट्रॉफीबाबत भाष्य केल्याप्रकरणी क्रीडा मंत्र्यावर BCCIने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या अनुपस्थितीत रजत पाटीदारला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, आतापर्यंत रजतला या संधीचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाही. त्यामुळे आता जर केएल राहुल चौथ्या कसोटी सामन्यात परतला तर रजत पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांनाही पदार्पणाची संधी मिळाली. आणि या दोन्ही खेळाडूंनी संधीच सोने केले. ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांनी दोन्ही सामन्यात उत्कृष्ट खेळी खेळली. त्यामुळे आता फक्त रजत पाटीदार चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहू शकतो.

India vs England 4th Test KL Rahul Playing 11 Marathi News
M.S.Dhoni: विराट अन् रोहितनेही धावा केल्या नाहीत, तरी मलाच बाहेर काढलं? धोनीवर स्टार खेळाडूचे मोठे आरोप, उडाली खळबळ

रजत पाटीदारने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 32 धावा आणि दुसऱ्या डावात फक्त 9 धावा केल्या. यानंतर रजतला तिसऱ्या कसोटी सामन्यातही संधी मिळाली. रजत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 5 धावांवर बाद झाला होता आणि दुसऱ्या डावात खातेही न उघडता बाद झाला होता.

अशा परिस्थितीत रजत पाटीदारला आणखी एक संधी देण्याच्या मनस्थितीत निवडकर्ते नसतील. जर केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर तो रांची कसोटी सामन्यात निश्चितच प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकतो. केएल राहुलचा सध्याचा फॉर्मही चांगला आहे. राहुलने मालिकेतील पहिल्या सामन्यातही उत्कृष्ट खेळी खेळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.