IND vs NZ: 'टॉस हरलो ते बरंच झालं कारण...', भारताविरुद्ध कसोटी जिंकल्यानंतर काय म्हणून गेला न्यूझीलंडचा कर्णधार?

IND vs NZ Test Series: नूझीलंडने भारताविरूद्धचा पहिला सामना ८ विकेटने जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
tom latham
tom lathamesakal
Updated on

IND vs NZ 1st Test: नूझीलंडने आज भारताला घरच्या मैदानावर तब्बल ३६ वर्षांनी पराभूत केले. याआधी १९८८ साली वानखेडे मैदानावर नूझीलंडने भारताला हरवले होते. त्यानंतर आज भारताला ८ विकेट्ने पराभवाचा सामना करावा लागला. नूझीलंडने भारतावर पहिल्या दिवसापासून वर्चस्व दाखवले आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नूझीलंडने जिंकला. भारताविरूद्धच्या या विजयाबद्दल न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने 'टॉस हरलो ते बरंच झालं', असे वक्तव्य केले.

टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली नूझीलंड संघ भारताविरूद्ध आपली पहिली कसोटी मालिका खेळत आहे. टॉम सामन्याबद्दल बोलताना म्हणाला, "आम्ही नाणेफेक हरलो हे बरंच झाल, कारण बंगळूरूच्या मैदानावर आम्ही प्रथम फलंदाजी करणार होतो. पण, नाणेफेक हरल्यानंतर आम्ही गोलंदाजी केली आणि त्याचा परिणाम चांगला झाला. पहिल्या दोन डावामध्ये आमचा खेळ सेट झाला. तिसऱ्या डावात भारत पुनरागमन करेल हे आम्हाला माहीत होते. पण गोलंदाजांनी नवीन चेंडूवर चांगले यश मिळवले. घरच्या मैदानावर भारत किती दर्जेदार आहे हे आम्हाला माहीत आहे. गोलंदाजीमध्ये नवीन चेंडूने आम्हाला मदत केली. तर, फलंदाजीमध्ये रचिन रविंद्र आणि टिम साऊदी यांच्यातील भागीदारीमुळे आम्हाला मोठी आघाडी घेता आली."

tom latham
IND vs NZ, Test: न्यूझीलंडने बंगळुरूचं मैदान जिंकलं! तब्बल ३६ वर्षांनी भारताला मायदेशात हरवलं

"विलियम ओ'रौर्क सामन्यात सुंदर गोलंदाजी करत होता. त्याला अनुभवी साऊदी आणि मॅट हेन्री यांनीही साथ दिली. पहिल्या डावात साऊदीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्या गोलंदाजीने आम्हाला टोन सेट करून दिला. शेवटच्या दिवशी केवळ १०० धावांचा पाठलाग करणे आमच्यासाठी चांगली गोष्ट होती. युवा खेळाडू रचिन गेल्या वर्षभरापासून उत्तम क्रिकेट खेळत आहे आणि यावेळी पहिल्या डावात त्याने आपला क्लास दाखवला. त्याची या सामन्यातील फलंदाजी आमच्यासाठी प्रेरणादीयी होती." टॉम पुढे म्हणाला.

tom latham
WTC 2025 Points Table: भारताचे टेंशन वाढले; न्यूझीलंडने बंगळुरू कसोटी जिंकत फायनलचे दार ठोठावले

नूझीलंडने पहिला सामना जिंकून मालिकेत १-०ने आघाडी घेतली. नूझीलंडच्या या विजयाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्ध्येच्या गुणांवर परिणाम झाला. सहाव्या स्थानी असलेला न्यूझीलंड संघाने यादीत चौथे स्थान मिळवले. तर, भारतीय संघ पहिल्या स्थानी कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.