IND vs NZ 1st Test : पहिले सत्र पावसामुळे वाया, एकही चेंडू न टाकता लंच ब्रेक! कधी होणार टॉस? जाणून घ्या अपडेट्स

IND vs NZ 1st Test day 1 Marathi Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले आहे.
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st Test esakal
Updated on

IND vs NZ 1st Test day 1 Marathi Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे, परंतु एकही चेंडू न टाकता लंच ब्रेक घेतला गेला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ घरचं मैदान पुन्हा गाजवण्यासाठी तयार झाला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने एका दिवसात ४०० धावा करणारा संघ हवा आहे, असे विधान दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण, पावसामुळे चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरवल्याचे दिसतेय.

१९५५ ते २०२१ या कालावधीत घरच्या मैदानावर IND vs NZ यांच्यात झालेल्या ३६ कसोटीत भारताने १७ जिंकल्या आहेत, तर २ गमावल्या आहेत. १७ कसोटी ड्रॉ राहिल्या आहेत. भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC ) गुणतक्त्यात अव्वल स्थानावर मजबूत केले आहे. भारतीय संघ ७४.२४ टक्केवारीसह अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड ३७.५० टक्क्यांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि त्यांना फायनल गाठण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, श्रीलंका दौऱ्यावर २-० असा पराभव पत्करून ते भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार दुपारच्या सत्रात पाऊस विश्रांती घेणार आहे आणि सामना सुरू होऊ शकतो.

भारत - रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, मार्क चॅम्पमन, विल यंग, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचीन रवींद्र, टॉम ब्लंडल, अजाझ पटेल, बेन सिर्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, विलियम ओ'रौर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.