India vs New Zealand Pune Test Day 1, Tea Time: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात गुरुवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचे फलंजाज चांगल्या भागीदारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याचवेळी भारताचे आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीपटूही वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
न्यूझीलंडकडून कर्णधार टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनेवे यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांविरुद्ध संयमी फलंदाजी केली होती. मात्र आठव्या षटकात फिरकीपटू अश्विन गोलंदाजीला आला आणि त्याने लगेचच लॅथमला १५ धावांवर पायचीत पकडले.