IND vs NZ, 3rd Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला आहे. पहिल्या दिवशी फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं. भारताच्या रविंद्र जडेजाने ५ विकेट्सही घेत हा दिवस गाजवला.
पहिल्याच दिवशी दोन्ही संघांच्या मिळून १४ विकेट्स गेल्या आहेत. दिवस संपला तेव्हा भारताने १९ षटकात ४ बाद ८६ धावा केल्या. भारतीय संघ अद्याप १४९ धावांनी पिछाडीवर आहे.
या सामन्यात न्यूझीलंडचा डाव २३५धावांवर संपल्यानंतर भारतीय संघ पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात फलंदाजीला उतरले. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या दोन मुंबईकर खेळाडूंनी घरच्या मैदानात केली. त्यांनी सुरुवात चांगल केली होती.
कर्णधार रोहित शर्मा आक्रमकही खेळत होता. परंतु, त्याला ७ व्या षटकात १८ धावांवर मॅट हेन्रीने बाद केले. पण त्यानंतर गिल आणि यशस्वी जैस्वालने भारताचा डाव पुढे नेला. या दोघांनी काही आक्रमक शॉट्सही खेळले.