India vs New Zealand 3rd Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना शुक्रवारी (१ नोव्हेंबर) खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत असून या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघांत बदल करण्यात आला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की जसप्रीत बुमराहला बरं वाटत नसल्याने त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. हा एकच बदल करण्यात आला आहे.