IND vs NZ 3rd Test Marathi update : यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याची एक चूक टीम इंडियाला महागात पडली. भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. ही कामगिरी आणखी उठावरदार झाली असती, जर ऋषभकडून चूक झाली नसती..भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस आतापर्यंत तरी भारताच्या नावावर राहिला आहे.आकाश दीपने चौथ्या षटकात डेव्हॉन कॉनवेला ( ४) पायचीत केले. कर्णधार टॉम लॅथम व विल यंग यांना फार काळ डाव सावरण्याची संधी दिली गेली नाही. वॉशिंग्टन सुंदर लॅथम ( २८) आणि रचीन रविंद्र ( ५) यांचे त्रिफळे उडवले. विल यंग व डॅरील मिचेल यांनी ७७ धावांची भागीदारी केली. पण, अनुभवी गोलंदाज रवींद्र जडेजाने ४५व्या षटकाच्या दोन फलंदाज माघारी पाठवले. विल यंग १३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटाकारांसह ७१ धावांवर बाद झाला. टॉम ब्लंडल खातं न उघडताच माघारी परतला. .भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स६१९ - अनिल कुंबळे (२३६ डाव)५३३* - रविचंद्रन अश्विन (१९८ डाव)४३४ - कपिल देव (२२७ डाव)४१७ - हरभजन सिंग (१९० डाव)३१५* - रवींद्र जडेजा (१४५ डाव)३११ - झहीर खान (१६५ डाव)३११* - इशांत शर्मा (१८८ डाव) .मिचेलने अर्धशतकी खेळी केली. तो आधीच बाद झाला असता, पंरतु ऋषभने रन आऊटची सोपी संधी गमावली. २२व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर मिचेलने कुशलतेने रिव्हर्स स्वीप मारला. तो शॉट स्लिप क्षेत्ररक्षकासमोरून गेला.मिचेल दुसरी धाव घेण्यासाठी पळाला, परंतु दुसऱ्या बाजूला यंग गोंधळलेला दिसला. तरीही मिचेल पळाला आणि मोहम्मद सिराजने चेंडू तातडीने ऋषभकडे फेकला. ऋषभने अचूकता दाखवली असती तर मिचेल बाद झाला असता .ग्लेन फिलिस्पनसे ( १७) आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु जड्डूने त्याचाही त्रिफळा उडवला. ऋषभने जीवदान दिलेला मिचेल एकहाती खिंड लढतोय आणि त्याच्या नाबाद ७२ धावांनी संघाला ८ बाद २१८ धावांपर्यंत पोहोचवले आहे. रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतल्या आहेत. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.